शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

पहिले इको फ्रेंडली विमान पोहोचले नागपुरात

By admin | Updated: March 20, 2016 03:11 IST

नागपूर ते दिल्लीदरम्यान नवे उड्डाण शुक्रवारी नव्या विमानाने सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ...

दररोज उड्डाण : इंडिगोला मिळणार १८० विमानेनागपूर : नागपूर ते दिल्लीदरम्यान नवे उड्डाण शुक्रवारी नव्या विमानाने सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी हातात एअरलाईन्सचे झेंडे घेऊन प्रवाशांचे स्वागत केले. विमान उतरल्यानंतर फायर टेंडरद्वारे विमान धुण्यात आले. या विमानाचे एरोब्रीजच्या अ‍ॅप्रॉनमध्ये पार्किंग करण्यात आले.उपराजधानीतून दिल्लीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता आणखी पर्याय उपलब्ध होत आहेत. सकाळी दिल्लीला जाऊन सायंकाळी परत येणाऱ्यांसाठी हे विमान सुविधाजनक आहे. दिल्लीवरून फ्लाईट क्रमांक ६ ई ९२९ दररोज दुपारी ४.१० वाजता उड्डाण करून नागपुरात सायंकाळी ५.५० वाजता येईल. एक तासानंतर फ्लाईट क्रमांक ६ ई ९३२ नागपूरवरून दिल्लीसाठी रवाना होईल. विमानात सर्व इकॉनॉमिक क्लासच्या सीट आहेत. त्याचे कमीतकमी भाडे ३६०० रुपये आहे. शुक्रवारी पहिल्या फ्लाईटमध्ये १५० प्रवासी दिल्लीवरून नागपुरात आले आणि १७० प्रवासी दिल्लीला रवाना झाले. (प्रतिनिधी)१५ टक्के इंधनाची बचतइंडिगो एअरलाईन्सच्या दलात सामील होत असलेल्या १८० नव्या विमानांपैकी सर्वात आधी एअरबस ३२० नागपूर एअरपोर्टवर उतरली. एअरलाईन्सजवळ एअरबस ३२० आधीच उपलब्ध आहे. परंतु नव्या विमानांचे इंजिन वेगळ्या पद्धतीचे आहे. हे इंजिन जुन्या मॉडेलपेक्षा १५ टक्के इंधनाची बचत करते. याशिवाय यातून कार्बन निघण्याचे प्रमाण कमी असून प्रवासी क्षमता १८० आहे.पुढील महिन्यात दोन नवे विमानइंडिगो एअरलाईन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात पुढील महिन्यात दोन नव्या ए-३२० विमानांची उड्डाणे सुरू केली जाऊ शकतात. त्यासाठी एअरलाईन्सची तयारी सुरू आहे. नवी विमाने आल्यानंतर नागपुरातून बाहेर पाठविण्यात येणाऱ्या आणि बाहेरून नागपुरात येणाऱ्या कार्गोसाठी सुविधा वाढणार आहेत.हैदराबादसाठी नवे विमाननागपुरातून हैदराबादसाठी ट्रुजेटची नवी फ्लाईट सुरू होऊ शकते. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी संबंधित एअरलाईन्स छोटे एटीआर विमान चालविणार आहे. याची क्षमता ७२ प्रवाशांची राहणार असून ही फ्लाईट दररोज राहील.