शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना फटकारले

By admin | Updated: March 29, 2015 02:33 IST

वैद्यकीय प्रकरणात अविचारपूर्वक आदेश दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेहकर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले.

नागपूर : वैद्यकीय प्रकरणात अविचारपूर्वक आदेश दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेहकर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले. तसेच, यापुढे असे आदेश देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. मेहकर येथील डॉ. विलास वऱ्हाडे व पॅथालॉजीतज्ज्ञ दीपक जैताळकर यांच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला होता. वैद्यकीय मंडळाने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोघांनाही वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी धरता येणार नसल्याचा अहवाल दिला. परिणामी पोलिसांनी एफआयआर नोंदविला नाही. यामुळे तक्रारकर्त्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांना आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिलेत. या आदेशाला डॉ. वऱ्हाडे व जैताळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वैद्यकीय प्रकरणातील तथ्ये व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे अवलोकन न करता पूर्णपणे अविचारीपणे हा आदेश देण्यात आला आहे असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत आदेश देताना प्रकरणातील तथ्ये व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट करून वादग्रस्त आदेश व एफआयआर रद्द केला आहे. तसेच, हे प्रकरण सदर निर्णयातील निरीक्षणांच्या आधारावर पुढील कार्यवाही करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परत पाठविण्यात आले आहे. तक्रारकर्त्याला २७ एप्रिल रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)