शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एम्सच्या १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच मिहानमधून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:08 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) एमबीबीएसचा ५० जागांवर गेल्या वर्षी प्रवेश देण्यात आला. यावर्षी १०० जागांवर प्रदेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांची ही पहिली बॅच ‘एम्स’च्या स्वत:च्या इमारतीतून म्हणजे मिहानमधून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देओपीडी सुरू करण्याला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) एमबीबीएसचा ५० जागांवर गेल्या वर्षी प्रवेश देण्यात आला. यावर्षी १०० जागांवर प्रदेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांची ही पहिली बॅच ‘एम्स’च्या स्वत:च्या इमारतीतून म्हणजे मिहानमधून सुरू होणार आहे. या शिवाय, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येईल, अशी माहिती ‘एम्स’च्या संचालक डॉ. विभा दत्ता यांनी दिली.मिहानमधील २०० एकर परिसरात ‘एम्स’चे बांधकाम होत आहे. स्वत:ची इमारत नसल्याने सप्टेंबर २०१८ पासून मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिले वर्ष व अपुऱ्या जागेमुळे ५० जागेवरच प्रवेश देण्यात आले होते. मात्र २०१९-२० या वर्षात १०० जागांवर प्रवेश दिले जाणार आहे. या विषयी अधिक माहिती देताना डॉ. दत्ता म्हणाल्या, मिहानमध्ये एम्सचा इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे.विद्यार्थ्यांचे वसतिगृह, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे निवासी गाळे व कॉलेज इमारतीच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. नुकतेच वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश दिला जाणाऱ्या १०० विद्यार्थ्याना या वसतिगृहात ठेवले जाईल. परंतु त्यांचे वर्ग मिहानमध्ये सुरू करायचे की मेडिकलमध्ये यावरील निर्णय उपलब्ध सोयींवर अवलंबून आहे. यामुळे वेळेवर या विषयी निर्णय घेतले जातील. मिहानमध्येच वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही डॉ. दत्ता म्हणाले.

‘ओपीडी’साठी यंत्रसामुग्री होत आहे उपलब्धडॉ. दत्ता म्हणाले, मिहानमधील ‘एम्स’च्या इमारतीतून ‘ओपीडी’ सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य व यंत्रसामुग्री उपलब्ध होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत ‘ओपीडी’ सुरू होईल. या शिवाय, १० खाटांचा वेगळा वॉर्ड तयार केला जात आहे. येथे गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठविले जाईल.

बांधकाम वेगाने सुरू‘एम्स’च्या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. जसजसे बांधकाम पूर्ण होईल व आवश्यक साहित्य उपलब्ध होतील तसतसे वर्ग खोल्या, ‘लॅब’ सुरू केल्या जातील. परंतु तूर्तास तरी एमबीबीएस दुसऱ्या वर्षाला असलेल्या ५० विद्यार्थी मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहात राहतील आणि येथेच शिक्षणही दिले जाईल.

टॅग्स :Medicalवैद्यकीय