शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:24 IST

काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले.

ठळक मुद्दे कांद्रीतील थरार : आरोपी अद्यापही पसार

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले. हा थरार कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथे बुधवारी (दि. २७) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला. जखमीची प्रकृती चिंताजनक असून मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वर्षभरातील ही तिसरी मोठी घटना आहे, हे विशेष! या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांना गवसले नाही.जगदीश शालिकराम श्रावणकर (५९, रा. मच्छीपूल, कामठी) असे जखमी वेकोलि कर्मचाºयांचे नाव आहे. ते वेकोलि कामठी खुल्या खाणीत आॅपरेटर पदावर कार्यरत आहेत. जगदीश हे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एमएच-४०/एएच-८४२४ क्रमांकाच्या बुलेट मोटरसायकलने कामठी येथून निघून वेकोलि खाणीत ड्युटीवर जात होते. दरम्यान कन्हानसमोर कांद्री बसथांब्याजवळ येताच काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जगदीश यांच्यावर पिस्तूलच्या दोन गोळ्या झाडल्या.त्यातील एक गोळी हवेत गेली तर दुसरी गोळी त्यांच्या कमरेत शिरली. त्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले. सकाळच्या सुमारास झालेल्या या फायरिंगने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. याबाबत कन्हान पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी जगदीश यांना लगेच वेकोलिच्या जे. एन. हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथून कामठीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर मेयोमध्ये हलविण्यात आले.गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरासह महामार्गावर नाकेबंदी करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार गायकवाड करीत आहे.वर्षभरातील तिसरी मोठी घटनाकन्हान परिसरातील वर्षभरातील ही तिसरी मोठी घटना आहे. गत १४ मे रोजी कन्हानच्या अमित ज्वेलर्समध्ये २१ लाख ४२ हजार रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर गोंडेगाव भागातील युको बँकेतही दरोडा टाकून सात लाख रुपये लंपास केले. त्यानंतर बुधवारी फायरिंग करण्यात आली. त्यात वेकोलि कर्मचारी जखमी झाला. यावरून या भागात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येते. युको बँकेत दरोडा टाकणाºयांना पकडण्यात अद्याप कन्हान पोलिसांना यश आलेले नसताना ही घटना घडली. या घटनेतील आरोपीही पसार झालेले आहेत. गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या संदर्भात कन्हान हे दिवसेंदिवस संवेदशनशील म्हणून पुढे येत आहे. दुसरीकडे आजच्या या घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता दूरध्वनी बंद असल्याने बराच वेळ संपर्क झाला नाही. तोपर्यंत आरोपी पसार झाले.