शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

नागपूरनजीकच्या बहादूरयात गुंडांचा गोळीबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 21:03 IST

उमरेड रोडवरील बहादूरा येथे काही गुंडांनी पिस्तूल व चाकूने हल्ला करून एक महिलेला आणि तिच्या मुलाला जखमी केले. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देआई व मुलगा जखमीतीन दिवसातील दुसरी घटनादहशतीचे वातावरण

ऑनलाईन लोकमतनागपूर : उमरेड रोडवरील बहादूरा येथे काही गुंडांनी पिस्तूल व चाकूने हल्ला करून एक महिलेला आणि तिच्या मुलाला जखमी केले. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री घडली.जखमीमध्ये कुंदा संजय नगरधने (४४) , त्यांचा मुलगा भावेश (२२) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात शहरात घडलेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.कुंदा नगरधने ह्या बहादुरा परिसरात पती संजय, दोन मुले भावेश व गुणवंत तसेच मुलगी वैष्णवी यांच्या सोबत राहतात. त्यांची या भागात ४ एकर जमीन आहे. मुलगा भावेश हा ट्रॅव्हल्सचे काम करतो. सोमवारी रात्री १२.१५ च्या सुमारास वैष्णवीला घराबाहेर काही आवाज ऐकू आला. तिने दार उघडून बाहेर बघितले असता, कुणीही आढळले नाही. मात्र ती दार लावत असताना पिस्तोलचा धाक दाखवून आरोपींनी तिला ओढून घेतले. वैष्णवीची मान पकडून तिला ढकलत ते तिला आतमध्ये घेऊन गेले.दरम्यान आरोपींचे काही साथीदार चाकू घेऊन होते. वैष्णवीने आरडाओरड करताच घरातील सर्वजण जागे झाले. आरोपींनी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून त्यांना चूप बसण्यास सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीला आरोपींच्या तावडीत पाहून भावेश संतापला आणि आरोपींवर तुटुन पडला. परंतु आरोपींनी त्याच्या पोटावर चाकुने वार केला. आपला मुलगा जखमी झाल्याचे पाहून आई कुंदा त्याला वाचवण्यासाठी धावताच आरोपींनी तिच्या पायावर गोळी झाडून जखमी केले. आई आणि भावाच्या जीवाला धोका असल्याचे बघून गुणवंतने लाठीने आरोपींवर हल्ला केला. गुणवंत अचानक आक्रमक झाल्यामुळे आरोपीच्या हातचा चाकू खाली पडला.दरम्यान आरडाओरड ऐकून शेजारी राहणारा बंटी जागा झाला. त्याने तत्काळ पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्याबरोबर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अप्पर आयुक्त श्यामराव दिगांवकर, उपायुक्त एस. चैतन्य घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात लोकांना विचारले असता, परिसरात एक इनोव्हा गाडी संशयास्पद स्थितीत दिसल्याचे त्यांनी सांगितले. इनोव्हाच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी दिघोरी नाक्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आहे. परंतु पोलिसांना इनोव्हाचा कुठलाही पुरावा मिळाला नाही.गुंड निर्ढावलेघडलेली घटना पाहू जाता गुंडांमध्ये पोलिसांचा भयच राहिला नाही, असे दिसते आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री जरीपटका येथे गुंडांनी गोळीबार करून दहशत माजवली होती. यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली आहे. नगरधने परिवारावर हल्ला करण्यासाठी आलेल्या आरोपींपैकी तिघांकडे पिस्तुले होती.नाकाबंदीचाही परिणाम नाहीया घटनेनंतर पोलीसांनी सक्करदरा ठाण्याच्या परिसरात नाकाबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली होती. संशयित इनोव्हा घटनेच्या पूर्वी बराच वेळ बहादूरा परिसरात फिरत होती. परंतु पोलिसांना माहितीच मिळाली नाही. यामुळे पोलिसांचे नेटवर्क कमजोर झाल्याचे दिसते आहे. बहादूरा सक्करदरा पोलीस ठाण्यापासून बºयाच अंतरावर आहे. परंतु बहादूरयाला लागून असलेला काही भाग नंदनवन ठाण्याच्या हद्दीत येतो. दिघोरी नाक्यावर पोलीस चौकी सुद्धा आहे. तिथे तैनात असलेल्या पोलीस   कर्मचारयांनाही याची माहिती मिळाली नाही.