शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंडाच्या घरासमोर गोळीबार; तीन जिवंत काडतूसे सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:49 IST

वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे आणि त्याच्या साथीदारांनी हल्लेखोरांवर धाव घेतल्यामुळे ते चार दुचाक्यांवर पळून गेले.

ठळक मुद्देवाडी भागातील थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे आणि त्याच्या साथीदारांनी हल्लेखोरांवर धाव घेतल्यामुळे ते चार दुचाक्यांवर पळून गेले. या घटनेमुळे वाडी परिसरात खळबळ निर्माण झाली असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.वाडी भागातील कुख्यात गुंड म्हणून भारत सहारे ओळखला जातो. तो आणि त्याचे सचिन तसेच सतीश नावाचे भाऊ आपापल्या परिवारासह एकत्र शिवाजीनगरातील (कंट्रोल वाडी) निवासस्थानी राहतात. सहारेची वाडी आणि आजुबाजूच्या परिसरात प्रचंड दहशत आहे. शुक्रवारी भारतची ३ वर्षीय पुतणी परी हिचा वाढिदवस होता. त्यामुळे संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळीसह सहारे एका दर्गा परिसरात गेला होता. तिकडून उशिरा रात्री ते घरी परतले. रात्रीचे १२ वाजले होते. सहारेने त्याचा मित्र संदीप क्षीरसागर याचा वाढिदवस सुरू होत असल्यामुळे केक कापण्याची तयारी चालवली होती. केक कापल्यानंतर ही सर्व मंडळी घरात बसली. पहाटे १.३० ते १.४५ च्या सुमारास त्यांनी आपल्या टीव्हीवर घरासमोरच्या सीसीटीव्हीवर नजर टाकली तेव्हा त्यांना तीन ते चार दुचाक्यांवर आठ ते नऊ जण संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यातील एक आरोपी सहारेच्या स्वीफ्ट कारवर (एमएच ४०/ एआर ३५८९) दगड मारून काच फोडण्याच्या तयारीत दिसल्याने सहारे, त्याचे भाऊ आणि राजा नेवारे, राहुल कडसुळे, पवन लांडगे तसेच जीवन मोहिते या साथीदारांसह हल्लेखोरांकडे धाव घेतली. त्यामुळे एका हल्लेखोराने पिस्तुलातून सहारेला धमकावत गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळी झाडली आणि आरोपी तीन मोटरसायकल तसेच एका अ‍ॅक्टीव्हावर बसून पळून गेले. सहारेने या घटनेची माहिती नियंत्रण कक्ष तसेच वाडी पोलीस ठाण्यात कळविली. पहाटे २ च्या सुमारास पोलिसांचा ताफा सहारेच्या घरासमोर पोहचला. पोलिसांनी कारच्या आजूबाजूला शोधाशोध केली तेव्हा त्यांना दोन रिकामी आणि तीन भरलेली काडतूसे सापडली. पोलिसांनी ती जप्त केली. सहारेच्या तक्र ारीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरु द्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Firingगोळीबार