शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

फटाके फोडताय सावधान! कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:51 IST

दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते. दरवर्षी असे सुमारे पाच टक्के रुग्ण कानांच्या गंभीर समस्यांनी त्रस्त होतात. फटाक्यांच्या वायू प्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देगर्भवतींनीही काळजी घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते. दरवर्षी असे सुमारे पाच टक्के रुग्ण कानांच्या गंभीर समस्यांनी त्रस्त होतात. फटाक्यांच्या वायू प्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.दिवाळीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मानवी शरीरावरही गंभीर परिणाम होतात. विशेषत: आपले कान हे साधारणपणे ३० ते ४० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतात. मात्र, विविध आवाजाचे फटाके हे १५० ते १६० डेसिबलपर्यंत आवाज करणारे असतात. त्या आवाजामुळे कानात दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखणे यांपासून कानाचा पडदा फाटणे, कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येण्यापर्यंतचे त्रास होऊ शकतात. मेडिकलमध्ये दरवर्षी दिवाळीदरम्यान असे रुग्ण हमखास येतात. तात्पुरते बहिरेपण आल्यास औषधोपचाराने ते काही दिवसांमध्ये पूर्ववत होऊ शकतात. मात्र, कायमस्वरूपी बहिरेपणही येऊ शकते. त्याच वेळी फटाक्यांच्या रसायनयुक्त धुरामुळे नाक, कान, घसा व फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होणे, खाज सुटणे आदी समस्याही निर्माण होतात.अचानक फुटणारे फटाके कानासाठी घातक-डॉ. नितनवरेमेडिकल रुग्णालयाच्या ईएनटी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए. झेड. नितनवरे यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे कानांच्या समस्यांनी त्रस्त किमान पन्नासवर रुग्ण येतात. जेव्हा १५०-१६० डेसिबलचे फटाके माहीत नसताना अचानक कानाजवळ फुटतात तेव्हा त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. औषधांनी काही अंशी कानांची श्रवण क्षमता आणली जाऊ शकते. अशा रुग्णांसाठी आॅडियोमेट्री तपासणी आवश्यक ठरते.

मोठ्या आवाजाचा गर्भवतींनाही धोका-डॉ. हुमणेमेडिकल येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अमोल हुमणे यांनी सांगितले की, फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा परिणाम गर्भवतींवरही होतो. पोटातील बाळ दचकते, अशावेळी समस्या निर्माण होण्याची भीती असते. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास कठीण जाते. अस्थमाच्या रुग्णांनी तर या दिवसांत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फराळाचे पदार्थही मोजकेच खावे, असा सल्लाही डॉ. हुमणे यांनी दिला.फटाक्यांपासून होणारे नुकसाननायट्रेट - मज्जातंतू निष्क्रियता, नायट्रिट-बेशुद्ध होणे, लेड (शिसे) - मज्जातंतूवर दुष्परिणाम, कॅडमियम - रक्तातील लोहाचे प्रमाण घटणे, किडनी निष्क्रिय होणे, सोडियम - त्वचेचे विकार, झिंक - उलट्या होणे, कॉपर - श्वासनलिकेचा विकार, मॅग्नेशियम - त्वचेचे विकार. ध्वनिप्रदूषणामुळे कर्णबधिरतेसह रक्तदाब वाढणे, हृदयविकार, झोपमोड असे परिणाम दिसून येतात.अशी घ्या काळजीशक्यतो फटाक्यांना दूरच ठेवा. फटाक्यापासून सुरक्षित अंतरावर उभे राहावे. पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे. बालकांना दूर ठेवा. मोकळ्या जागेत फटाके फोडा. शक्यतो सुती कपडे घाला व पायात जोडे वापरा. कानांमध्ये बोळे ठेवा, बोळ्यांमुळे ५० टक्के आवाजात घट होते. कुठलीही समस्या झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके