शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात आगीचा भडका

By admin | Updated: May 19, 2017 02:34 IST

रामदासपेठ येथील तुली इम्पिरियलच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका बंद पडलेल्या खासगी रुग्णालयाला आग लागली.

रामदासपेठेतील घटना : शॉर्टसर्किट की निष्काळजीपणा? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामदासपेठ येथील तुली इम्पिरियलच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका बंद पडलेल्या खासगी रुग्णालयाला आग लागली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. परंतु स्थानिक नागरिकांनी मात्र या रुग्णालयात मनमानी पद्धतीने राहत असलेल्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचे सांगितले. आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आग एका खोलीमध्येच लागली होती. त्यामुळे आग पसरली नाही किंवा खालपर्यंत आली नाही. परंतु धुरामुळे परिसरातील लोक हादरून गेले होते. काही वेळेसाठी तर वाहतूकही जाम झाली होती. या इमारतीमध्ये अनेक खासगी रुग्णालये आणि इतर दुकाने आहेत. दुकानदारांनी सांगितल्यानुसार दुसऱ्या माळ्यावर डॉ. पाटील यांचे खासगी रुग्णालय आहे. परंतु हे रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. याच्या देखभालीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. बंद पडलेल्या या रुग्णालयात काही लोक राहतात. आत जागोजागी गाद्या टाकलेल्या आहेत. येथे बसूनच ते सिगारेट पितात. अशाच प्रकारच्या निष्काळजीपणातून ही आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु याबाबत अधिकृत मात्र कुणीही बोलायला तयार नाही. मोठा अनर्थ टळला ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या बाजूलाच दुसरे रुग्णालय आहे. येथे लहान मुलांना भरती करण्यात आले होते. आगीच्या घटनेमुळे या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक हादरून गेले होते. तातडीने मुलांना व दुसऱ्या रुग्णांना तातडीने सुरक्षित जागी हलविण्यात आले. तेव्हा कुठे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आगीची व्याप्ती वाढली असती तर मोठा अनर्थ घडला असता. रुग्णालयातील सुरक्षितता चव्हाट्यावर डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून नेहमीच ओरड केली जाते. डॉक्टरांच्या संघटना यासाठी आघाडीवर असतात. राज्य शासनाने यासंदर्भात कायदाही केला आहे. परंतु रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे काय? या घटनेमुळे मेडिकल हब बनलेल्या धंतोली व रामदासपेठ येथील रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.