शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रामझुल्याखालील रेल्वेच्या कचºयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:30 IST

जयस्तंभ चौकाजवळील रामझुल्याखाली साचलेल्या कचºयाला शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

ठळक मुद्देप्लास्टिकमुळे आग भडकली : अग्निशमनच्या गाड्यांमुळे वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जयस्तंभ चौकाजवळील रामझुल्याखाली साचलेल्या कचºयाला शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.रामझुला टप्पा-१ च्या जयस्तंभ चौकाच्या उतार भागात खाली कचरा टाकला जातो. यात प्लास्टिकचाही समावेश आहे. पुलाखाली कचºयाचा ढीग साचला आहे. दुपारी अचानक कचºयातून धूर निघायला लागला. यामुळे वाहन चालक व ये-जा करणाºयांत घबराट पसरली.थोड्या वेळात अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र अग्निशमन विभागाच्या गाडीमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत कचºयाच्या ढिगाºयातून धूर निघत होता.रायपूर अग्निकांडाच्यापुनरावृत्तीचा धोकारायपूर रेल्वेच्या पार्किंग भागात काही महिन्यांपूर्वी भीषण आग लागली होती. यात अनेक वाहने खाक झाली होती. रामझुल्याखालीही रेल्वेचे र्पािर्कंग आहे. येथे दुचाकी वाहने ठेवली जातात. या वाहनांना आग लागली असती तर रायपूर अग्निकांडाची पुनरावृत्ती होण्याचा धोका होता.रेल्वेने बनविले कचराघरस्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेचे अधिकारी झाडू मारताना दिसतात. परंतु रेल्वे स्टेशनवरील स्टॉल व डस्टबिनचा कचरा रामझुल्याखाली टाकला जातो. यात प्लास्टिकचाही समावेश आहे. वास्तविक रेल्वे प्रशासनाने महापालिकेला यासंदर्भात सूचना केल्यास येथील कचरा भांडेवाडी येथे नेता येतो. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.महापालिकेचे दुर्लक्षमहापालिकेने कनक रिसोर्सेस यांच्याकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविली आहे. परंतु रामझुल्याखालील कचरा उचलला जात नाही. महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष आहे. रामझुल्याखाली कचरा नसता तर आगीची घटना घडली नसती.