लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-नागभिड ब्रॉडगेज मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत केली आहे.नागपूर ते नागभीड रेल्वे लाईन ही आधी नॅरोगेज लाईन होती. रेल्वे मंत्रालयाने सर्व नॅरोगेज लाईनच्या ठिकाणी ब्रॉडगेज लाईन टाकण्याचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने देशभरात नॅरोगेज लाईनच्या ठिकाणी ब्रॉडगेजचे जाळे पसरविण्यात येत आहे. नागपूर-नागभिड लाईनचा ब्रॉडगेजमध्ये समावेश करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या कामाला मंजुरी दिली. हे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीला देण्यात आले आहे. नागपूर-नागभिड ब्रॉडगेजच्या कामासाठी रेल्वे अर्थसंकल्पात अत्यल्प तरतूद करण्यात आल्यामुळे हे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत केली. त्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै २०१९ रोजी नागपूर-नागभिड लाईनचा मूलभूत मंजुरीत समावेश केल्याचे सांगून हे काम लवकर पूर्ण होणार असल्याचे संसदेत सांगितले.
नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:53 IST
नागपूर-नागभिड ब्रॉडगेज मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत केली आहे.
नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा
ठळक मुद्देकृपाल तुमाने यांची संसदेत मागणी