आयुक्तांचे निर्देश : पंप हाऊ स डिसेंबरपर्यत पूर्ण करानागपूर : जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या पेंच टप्पा -४ च्या कामाची गती बघता ते निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नाही. याची दखल घेत मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी या प्रकल्पाचे काम कृती आराखड्यानुसार निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले.निर्धारित कालावधीत काम पूर्ण व्हावे ,यासाठी वर्धने यांनी कामाची पाहणी केली. तसेच सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पेंच प्रकल्पातील अंतर्गत विहीर व पंप हाऊ सचे काम डिसेंबरपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.पेंच टप्पा -४ च्या २३०० मि.मी. व्यासाच्या पाईप लाईनच्या शिल्लक कामाची वर्धने यांनी माहिती घेतली. सावनेर मार्ग व मानकापूर रेल्वे लाईन येथील नाल्याजवळ तसेच घोगली गावाजवळ पाईप लाईनचे काम सुरू आहे. दहेगाव येथील रेल्वे लाईनखाली टाकण्यात येणाऱ्या बॉक्स कल्वर्ट व पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेले विहिरीचे काम संथ असल्याचे निदर्शनास आले. यावर वर्धने यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकल्पाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे, यासाठी पारशिवनी येथील कॅम्प हाऊ स कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत कृती आराखड्यानुसार निर्धारित कालावधीत काम पूर्ण करा, असे निर्देश वर्धने यांनी दिले. याची जबाबदारी अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे यांच्यावर सोपविण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे , कार्यकारी अभियंता शाम चव्हाण, ओएसडी मो.इसराईल, शाखा अभियंता राजेश दुफारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पेंच-४ चे काम मुदतीत पूर्ण करा
By admin | Updated: November 24, 2014 01:17 IST