शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात थुंकणाऱ्यांकडून पाच हजारांचा दंड वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 01:16 IST

नागरिकांच्या सवयीवर बंधनासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात विशेष मोहीम राबवली. काही तासातच २७ जणांवर कारवाई करीत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि यापुढे असे कृत्य करू नये, या शब्दात बजावले.

ठळक मुद्देमनपाच्या उपद्रव शोधपथकाची संविधान चौकात कारवाई

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राहावी, यासाठी सर्वस्तरावर जनजागृती होत असताना काही नागरिक मात्र आपल्या सवयी सोडण्यास तयार नाहीत. अशा नागरिकांच्या सवयीवर बंधनासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात विशेष मोहीम राबवली. काही तासातच २७ जणांवर कारवाई करीत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि यापुढे असे कृत्य करू नये, या शब्दात बजावले.आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोधपथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात धरमपेठ आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोधपथकाच्या चमूने ही कारवाई केली. शहरातील रस्त्यांवर थुंकल्याने संसर्गजन्य रोगाचा प्रसार अधिक होतो. त्यातच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शहरातील प्रशासकीय यंत्रणा याबाबत अधिक सतर्क आहे. थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कंबर कसली आहे. याअंतर्गत गुरुवारी संविधान चौकात कारवाई करण्यात आली. कारवाईतून एकूण पाच हजार रुपये उपद्रव शोधपथकाने वसूल केले असून १ मार्च ते १८ मार्चपर्यंत सुमारे २०४ थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. वसूल केलेल्या दंडाची रक्कम ४०,२०० रुपये इतकी आहे.बसमधून थुंकणाऱ्यांवरही कारवाई मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील प्रवासी, स्टार बसमधील प्रवासी, ऑटोचालक, कारचालक, ट्रकचालक अशा विविध २४ व्यक्तींनी रस्त्यावर थुंकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत प्रति व्यक्ती २०० याप्रमाणे ४६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गाडीतूनच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या चार व्यक्तींवरही पथकाने कारवाई केली. प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका