शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

देहव्यापारातील मुलीच्या खऱ्या पालकांचा शोध घ्या; हायकोर्टाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:29 IST

देहव्यापार करीत असलेली व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून ताब्यात घेण्यात आलेली तरुणी कुसुम हिला पुढील आदेशापर्यंत नागपुरातील करुणा महिला वसतिगृहात ठेवून तिच्या खऱ्या पालकांचा शोध घेण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

ठळक मुद्दे अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्याची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देहव्यापार करीत असलेली व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून ताब्यात घेण्यात आलेली तरुणी कुसुम हिला पुढील आदेशापर्यंत नागपुरातील करुणा महिला वसतिगृहात ठेवून तिच्या खऱ्या पालकांचा शोध घेण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले. तसेच, याचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मध्य प्रदेशातील रायगड जिल्ह्यात राहणारी महिला राजूबाई हिने कुसुम ही तिची मुलगी असल्याचा दावा करून कुसुमचा ताबा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु, कुसुमने राजूबाई तिची आई नसल्याचे न्यायालयाला सांगितले. परिणामी, न्यायालयाने प्राथमिक तथ्ये लक्षात घेता वरील निर्देश दिलेत. तसेच, राजूबाई व कुसुमला रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड कुणी दिले याची माहिती मिळविण्यात यावी आणि वसतिगृह अधीक्षक व वणी पोलीस वगळता कुणालाही कुसुमची भेट घेऊ देऊ नये, असे आदेशही दिलेत. प्रकरणावर आता २५ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल.न्यायालयात सादर माहितीनुसार, कुसुमला ती अल्पवयीन असताना बबिता नावाच्या नातेवाईक महिलेकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर बबिताने ग्वाल्हेर येथे कुसुमकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतला. तेथून तिला वणी येथील रेखा नावाच्या महिलेकडे आणण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी देहव्यापाराच्या संशयावरून रेखाच्या घरी धाड टाकली. त्या ठिकाणी कुसुम आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी बबिता व रेखाविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि बाल न्याय मंडळाच्या आदेशावरून कुसुमला करुणा महिला वसतिगृहात आणले. न्यायालयात याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. टी. जी. बनसोड, सरकारतर्फे अ‍ॅड. चारुहास लोखंडे तर, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय