शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

कृत्रिम पायासाठी हवे आर्थिक पाठबळ

By admin | Updated: July 4, 2014 01:17 IST

खेळण्याबागडण्याच्या वयात एका अपघाताने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेला पाय गुडघ्यापासून कापण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर तो कापलासुद्धा. आता त्याला कुबड्यांचा आधार लागतो.

दुर्गेशला कुबड्यांचा आधार : समाजाच्या हातभाराने होणार उभा!अभय लांजेवार - उमरेडखेळण्याबागडण्याच्या वयात एका अपघाताने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेला पाय गुडघ्यापासून कापण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर तो कापलासुद्धा. आता त्याला कुबड्यांचा आधार लागतो. कृत्रिम पाय बसविण्याचा सल्ला डॉक्टरांनी देत त्यासाठी दोन लाखाच्या आसपास खर्च येईल, असे सांगितले. मात्र घरात अठराविश्वे दारिद्र्य... त्यातच होता तो पैसा ‘त्याच्या’ उपचारावर खर्च केला. त्यामुळे विद्यार्थीदशेत असलेल्या ‘त्याच्या’साठी कृत्रिम पाय कुठून आणणार. एवढा खर्च झेपणार का, हा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहे. परंतु समाजाने आर्थिक हातभार लावला तर ‘त्याला’ कृत्रिम पाय बसविणे शक्य होऊन, तो पुन्हा सर्वसामान्यांसारखा चालू शकतो.दुर्गेश शिवशंकर ब्रम्हे (१९, रा. आसगाव, पवनी) असे या अपघातग्रस्त विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी १४ जून २०१२ रोजी चुलतभाऊ रोशनसोबत तो मांगली येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जबर धडक दिली. दुर्गेशचा उजवा पाय नांगरात अडकला आणि तो काही अंतरावर फरफटत गेला. रक्तबंबाळ झालेल्या दुर्गेशसह रोशनने मदतीसाठी याचना केली. बऱ्याच वेळेनंतर दोघांनाही पवनी आणि नंतर दुर्गेशला नागपूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथून मेडिकल, सुपर स्पेशालिटी येथे हलवून तुटलेल्या नसवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर १७ दिवसानंतर मेडिकलमध्ये भरती केल्यावर गुडघ्यापासून पाय कापावा लागला.या अपघातानंतर त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दुर्गेशला लागलेल्या कुबड्या निघू शकतात, त्यासाठी साधारणत: दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु घरची परिस्थिती बिकट असल्याने एवढे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न ब्रम्हे कुटुंबीयांना पडला आहे. वडील शिवशंकर हे खेडोपाडी जाऊन कपबशा विक्रीचा व्यवसाय करतात. आई धुणीभांडीच्या कामास जाते. लहान भाऊ आशिष आणि बहीण कल्याणीचेही शिक्षण सुरू आहे. थोडा फार पैसा हाती आला तेव्हा दुर्गानगरी परसोडी (वॉर्ड २३) येथे कसेबसे घर उभारले. नंतर अपघात होताच बांधकाम अपूर्णावस्थेत ठेवत असलेला पैसा दुर्गेशच्या उपचारासाठी लावला. दुर्गेश हा सध्या उमरेड पॉलिटेक्निकमध्ये द्वितीय वर्षाला आहे. त्याचे वडील दररोज दुचाकीने त्याला कॉलेजमध्ये सोडतात.