शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरी भरण्यासाठी मनपाचे वित्त आयोगाला साकडे

By admin | Updated: November 28, 2014 01:04 IST

चौथ्या वित्त आयोगाचे सदस्य जे.पी. डांगे यांनी आज नागपूर महापलिकेचा आढावा घेतला. या वेळी प्रशासनाने महापालिका आर्थिक संकटात असल्याचे सांगत विकास कामे पूर्ण करण्यासाठी तब्बल

जे.पी. डांगे यांनी घेतला आढावा : आयुक्तांनी मांडला लेखाजोखानागपूर : चौथ्या वित्त आयोगाचे सदस्य जे.पी. डांगे यांनी आज नागपूर महापलिकेचा आढावा घेतला. या वेळी प्रशासनाने महापालिका आर्थिक संकटात असल्याचे सांगत विकास कामे पूर्ण करण्यासाठी तब्बल २५६ कोटी रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर आर्थिक टंचाईमुळे महापालिकेपुढे असलेली विविध संकटे आयोगासमोर मांडत मदतीसाठी आयोगाला साकडे घातले. बैठकीला आयुक्त श्याम वर्धने, अपर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त आर.झेड. सिद्धिकी, उपायुक्त संजय काकडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, अच्युत हांगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे आदी यावेळी उपस्थित होते. वर्धने यांनी महापालिकेचा खर्च व उत्पन्नाचे स्रोत यात तफावत निर्माण झाली असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. जकात रद्द करून एलबीटी ( स्थानिक संस्था कर ) लागू करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात १७५ कोटी रुपयांची तूट आली आहे. नागपूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता विविध विकास कामे करण्यासाठी निधी कमी पडत आहे. या सर्व कामांसाठी २५६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी, अशी विनंती आयोगाकडे करण्यात आली. महापालिकेला करावे लागत असलेले घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, पथदिवे, रस्ते विकास यासाठी लागणारा शंभर टक्के निधी शासनाने द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, अशी भूमिका मांडण्यात आली. परिरक्ष अनुदान, सप्रयोजन अनुदान, कर्ज घेण्याची व्याप्ती यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली.(प्रतिनिधी)