शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा : दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संघटना संतप्त

By admin | Updated: January 21, 2016 02:38 IST

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संपूर्ण देशात संतप्त पडसाद उमटत आहे.

कुलगुरुंना बडतर्फ करानागपूर : हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संपूर्ण देशात संतप्त पडसाद उमटत आहे. नागपुरतील आंबेडकरी संघटनांसह विविध पक्ष व संघटनांनीसुद्धा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत असून, याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी व राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. तसेच एका दलित विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे बुधवारी विद्यापीठ ग्रंथालयासमोर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर (कॅम्पस) येथे रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी जाहीर निषेध नोंदविण्यात आला. रोहितच्या आत्महत्येला मानव संसाधन विकास मंत्रालय, केंद्रीय विद्यापीठ हैदराबाद प्रशासन व कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्रात्रेय हे जबाबदार असून, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्याात आली. तसेच रोहितचे इतर चार मित्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात प्रमोद कुमार, मंगेश गडपायले, प्राची घोडेस्वार, नितीन फुके, मंगेश भैसारे, संदीप सूर्यवंशी आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे बुधवारी संविधान चौकात या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. कुलगुरू अप्पा राव, स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना बरखास्त करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते सिद्धार्थ पाटील, अहमद कादर, ईश्वर कडबे, हटवार दादा, राजेश बोरकर, विनोद पाटील, रमेश पाटील, शरद वंजारी, डॉ. विनोद रंगारी, बी.बी. खोब्रागडे आदी उपस्थित होते. आंबेडकरी-बौद्ध संघटना आंबेडकरी बौद्ध संघटनांच्यावतीने संविधान चौकात रोहित वेमुला याच्या आत्महत्याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तसेच रोहितला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक गोडघाटे, रणजित मेश्राम आदींसह आंबेडकरी-बौद्ध चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. जनता दल (सेक्युलर) रोहित वेमुला या हुशार दलित विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे आरोपी हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हैदराबाद शाखेच्या विद्यार्थ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी जनता दल सेक्युलरचे नागपूर शहर महासचिव विजयकुमार खोब्रागडे यांनी केली. आरोपींना तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खोब्रागडे यांच्यासह शिवराज परपोटे, के.के. कदीर, सुरेश बागडे, जमील शेख, विनोद आत्राम, जगदीश भोगे, जयनुल चौधरी, वसंत डेकापूरवार, नितीन जामगडे आदींनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय व स्मृती इराणी यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच कुलगुरू अप्पा राव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे (पाटील), अनिल अहिरकर, बजरंगसिंह परिहार, प्रशांत बनकर, शैलेंद्र तिवारी, ईश्वर बाळबुधे, जावेद हबीब, पंकज ठाकरे, चरणजितसिंह चौधरी, जानबा मस्के, महेंद्र भांगे, वर्षा शामकुळे, आलोक पांडे, विनोद हेडाऊ आदी उपस्थित होते. भीमशक्तीतर्फे आज निदर्शने भीमशक्ती या संघटनेच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)