राजीव सिंह ल्ल नागपूरशहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ३०० कोटीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्य सरकार महापालिकेला यासाठी १०० कोटी रुपये देणार आहे. परंतु गेल्या दहा महिन्यात सिमेंट रस्त्याची फाईल सर्व्हेपर्यंतच पोहचली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब लागणार, अशी चिन्हे दिसून येत आहेत. स्थायी समितीच्या मागील सभेत शहरातील प्रस्तावित सिमेंट रस्त्यांचा सर्व्हे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. परंतु शहरातील ५५ रस्त्यांच्या सर्व्हेला किती कालावधी लागेल हे सांगायला कुणीही तयार नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्रकल्पाचा खर्च ३०० कोटीवरून ३२४ कोटीवर गेला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव मागील दहा महिन्यांपासून थांबला आहे. गतीने काम होत आहेडिसेंबर महिन्यापर्यंत निविदा काढून सिमेंट रस्त्याचे काम सुरू केले जाईल. या प्रकल्पाला विलंब झालेला नाही. कोणताही प्रकल्प इतक्या तातडीने हाती घेण्यात आलेला नाही. या प्रकल्पासाठी महापालिकेला ३०० कोटी द्यावयाचे नाहीत. राज्य सरकार व नासुप्र प्रत्येकी १०० कोटी देणार आहे. यातून कामाला सुरुवात केली जाईल. महापालिक ा आपल्या वाट्याच्या १०० कोटीची व्यवस्था करणार आहे. रमेश सिंगारेअध्यक्ष, स्थायी समिती ,महापालिका
दहा महिन्यांत फाईल सर्व्हेपर्यंत!
By admin | Updated: October 20, 2015 03:36 IST