शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: July 26, 2014 03:02 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस

नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. शुक्र वारी पूर्व नागपुरातील दोन बोगस डॉक्टरांच्या विरोधात कळमना पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. बोगस डॉक्टरात सुभाषनगर येथील सज्जन अग्रवाल व विजयनगर येथील लंकेश कनौजे यांचा समावेश आहे. पारडी भागात दोन बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकाने अग्रवाल याचेवर पाळत ठेवली होती. अग्रवाल हा सूर्यनगर येथील रहिवासी असून सुभाषनगर येथे त्याचा दवाखाना असल्याचे निदर्शनास आले. बोगसपणा निदर्शनास येऊ नये म्हणून त्याने दवाखान्यापुढे कोणताही फलक लावलेला नव्हता. चौकशीदरम्यान त्याच्या दवाखान्यात आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथी औषधे आढळून आली. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाबाबतचे प्रमाणपत्र नाही. त्याचेकडे आग्रा येथील आयुर्वेदिक विश्वविद्यालयाचे प्रमाणपत्र आढळून आले. कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना लंकेश कनौजे रुग्णांना आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथी औषधी देत होता. दोघांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३४ अन्वये कारवाई करण्यात आली. मनपाचे अपर आयुक्त हेमंत पवार व आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या निर्देशानुसार डॉ. सुनील घुरडे व डॉ. विजय जोशी यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)