शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी होले-कुकरेजा यांच्यात रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:00 IST

शहरातील विकास कामांना गती मिळावी. सोबतच जातीय समीकरणाचा विचार करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी नगरसेवक सतीश होले, वीरेंद्र कुकरेजा, राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले आदींच्या नावांवर भाजपाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देपोहाणे, बंगाले व घोडपागे शर्यतीत : सात सभापतींना नारळ तर तिघांना पुन्हा संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा व विधानसभेच्या पुढील वर्षात निवडणुका होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामांना गती मिळावी. सोबतच जातीय समीकरणाचा विचार करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी नगरसेवक सतीश होले, वीरेंद्र कुकरेजा, राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले आदींच्या नावांवर भाजपाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाच जणांची नावे चर्चेत असली तरी अध्यक्षपदासाठी होले व कुकरेजा यांच्यातच खरी रस्सीखेच सुरू आहे. अध्यक्षांच्या नावावर मंगळवारी सकाळी भाजपाच्या पार्लमेन्ट्री बोर्डाच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.सर्व विधानसभा क्षेत्रांतील नगरसेवकांना स्थायी समिती व विशेष समित्यांवर प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. यात जुन्यासोबतच नवीन चेहºयांना संधी दिली जाणार आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असले तरी वीरेंद्र कुकरेजा व सतीश होले यांच्या पैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले यांची नावे चर्चेत असली तरी बंगाले यांना स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापतिपदी कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेश घोडपागे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्याकडे जलप्रदाय समितीची जबाबदारी होती. यामुळे त्यांची नावे मागे पडण्याची शक्यता आहे.तीन सभापतींना पुन्हा संधीस्थापत्य व विद्युत समितीचे सभापती संजय बंगाले, शिक्षण विशेष समितीचे सभापती दिलीप दिवे व क्रीडा समितीचे नागेश सहारे यांना सभापतिपदावर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सभापती मनोज चाफले, अग्निशमन समितीचे सभापती अ‍ॅड. संजय बालपांडे, महिला व बालकल्यास सभापती वर्षा ठाकरे, गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापती चेतना टांक, जलप्रदाय समितीचे राजेश घोडपागे, विधी सभापती अ‍ॅड. मिनाक्षी तेलगोटे तसेच कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती अविनाश ठाकरे आदींना निरोप दिला जाणार आहे.धुरडे यांची वर्णी?महापालिकेतील भाजपाच्या प्रतोद दिव्या धुरडे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापदीपदी निवड होण्याची शक्यता आहे. तसेच अभय गोटेकर यांनाही सभापतिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभापतींची निवड करताना प्रामुख्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक