शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या वर्षीच समजेल पन्नाशीतील आजार

By admin | Updated: January 17, 2016 02:45 IST

केवळ पाच सीसी रक्ताच्या माध्यमातून पाच वर्षाच्या मुलाला ५० वर्षानंतर होणाऱ्या आजाराची माहिती मिळू शकेल.

‘जीनोम’ तंत्रज्ञानामुळे ‘सायंटिफिक’ जन्मपत्रिका शक्य : अश्विन मेहता यांच्याशी संवाद नागपूर : केवळ पाच सीसी रक्ताच्या माध्यमातून पाच वर्षाच्या मुलाला ५० वर्षानंतर होणाऱ्या आजाराची माहिती मिळू शकेल. ही अशक्य वाटणारी गोष्ट ‘जीनोम’ तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. अमेरिकेत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘सायंटिफिक’ जन्मपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेवर अभ्यास सुरू आहे. येणाऱ्या पाच वर्षात या जन्मपत्रिकेला मोठी मागणी असणार आहे, हा दावा जसलोक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक व इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अश्विन बी. मेहता यांनी केला आहे.अर्नेजा हार्ट अ‍ॅण्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) व असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया (एपीआयआय) विदर्भ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून दोन दिवसीय ‘नागपूर लाईव्ह-२०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेहता म्हणाले, ‘जीनोम’ हे फार प्रभावी तंत्रज्ञान आहे. यात संबंधित मुलाला वयाच्या ४५व्या वर्षी मधुमेह, ५५व्या वर्षी कॅन्सर, ६०व्या वर्षी हृदयरोग आदी होणार किंवा नाही याची माहिती मिळेल. या सायंटिफीक पत्रिकेत कुठला आजार होण्याची शक्यता आणि संभावित तारखेचाही उल्लेख असणार आहे. जर आजार होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळत असेल तर त्यावर उपचार किंवा प्रतिबंधक उपाययोजना करणे शक्य होऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्रात हे एकक्रांतिकारी संशोधन ठरेल. अमेरिकेत याचा उपयोग होणे सुरू झाले आहे. भारतातही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.