शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पाचवीपासून सेमी इंग्लिश

By admin | Updated: August 17, 2014 00:47 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पुढील वर्षी पाचवीसाठी ‘सेमी इंग्लिश पॅटर्न’ लागू केला जाणार आहे. शनिवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जि. प. शिक्षण समितीचा निर्णय : गळती रोखण्याचा प्रयत्ननागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पुढील वर्षी पाचवीसाठी ‘सेमी इंग्लिश पॅटर्न’ लागू केला जाणार आहे. शनिवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.दरवर्षी कमी होत असलेल्या पटसंख्येला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्र म राबविले जात आहेत. परंतु पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला असून जि.प.शाळांत ही सुविधा नाही. याचा पटसंख्येवर परिणाम होत आहे. मागील काही वर्षात सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात आले. परंतु अशा मोजक्याच शाळा आहे. त्यामुळे जि.प.शाळांच्या तुलनेत खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.जि.प.च्या १५८२ शाळा आहेत. यात उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या निर्णयामुळे पटसंख्या वाढीला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. जि.प.च्या हिंदी माध्यमांच्या काही शाळांवर मराठी डीएड शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे हिंदी माध्यमांच्या शाळांवर हिंदी डीएड शिक्षकांच्याच नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती वंदना पाल यांनी दिली. कामठी-महालगाव महामार्ग जि.प.शाळा परिसरातून गेला आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना शाळा बांधकाम करण्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु शाळेचे बांधकाम अर्धवट आहे. या संदर्भात चौकशी करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सदस्य शिवकुमार यादव, पुष्पा देशभ्रतार, शोभा झाडे, शांता कुमरे, सुधाकर ढोणे, गोपाल खंडाते, शिक्षणाधिकारी ललित रामटेके यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)