शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फेरमतदानात २० मतदार वाढले

By admin | Updated: February 7, 2017 01:50 IST

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नंदनवन येथील बुथ क्रमांक २५ मनपा मराठी प्राथमिक शाळेत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया चुकीची राबविल्याने ...

बुथ क्रमांक २५ वर झाले मतदान : सर्वच उमेदवारांनी मांडला ठिय्यानागपूर : नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नंदनवन येथील बुथ क्रमांक २५ मनपा मराठी प्राथमिक शाळेत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया चुकीची राबविल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात झाली. या बुथवर ५७० मतदार होते. सायंकाळी ४ पर्यंत ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३ फेब्रुवारीला याच बुथवर ४६८ मतदारांनी मतदान केले होते. त्यात आज २० मतदारांची भर पडली. शिक्षक मतदारसंघाचे ३ फेब्रुवारीला मतदान व ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. परंतु बुथ क्रमांक २५ वर निवडणूक अधिकाऱ्याने चुकीची प्रक्रिया राबविली. मतदाराच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर पक्की शाई न लावता, मार्कर पेनचा उपयोग केला होता. यासंदर्भात शिक्षक भारतीचे पदाधिकारी दिलीप तडस यांनी आक्षेप घेत, निवडणूक अधिकाऱ्याने राबविलेल्या चुकीच्या प्रक्रियेची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप कुमार यांनी बुथ क्र. २५ वर निवडणूक प्रक्रियेचा चुकीचा अवलंब केल्यामुळे येथे फेरमतदानाचा निर्णय घेतला व मतमोजणी ७ फेब्रुवारीला घेण्याचे आदेश दिले. सोमवारी सकाळी ८ पासून मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या बाहेर सर्व पक्ष व संघटनांचे उमेदवार सक्रिय झाले होते. कुणी मतदारांना मनस्ताप झाल्यामुळे मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले. काही उमेदवारांनी मतदान प्रक्रिया बाजूला सारून फोटोसेशन करून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले. अतिशय शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.(प्रतिनिधी)आज मतमोजणी, ५ पर्यंत निकाल अपेक्षित२९,१७६ मतदारांनी १६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद केले आहे. मंगळवारी सकाळी ८ पासून सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल ठेवण्यात आले आहेत. नऊ फेऱ्यांमध्ये सुरुवातीची मतमोजणी होईल. त्यानंतर मतपत्रिकेवर नोंदविण्यात आलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन तपशीलवार मोजणी होईल. एकूण मतदानापैकी ५० टक्के मते ज्यांना मिळतील, तो मतदार विजयी ठरेल. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या पसंती क्रमावर नागो गाणार विजयी झाले होते. यावर्षी झालेले मतदान, उमेदवारांची वाढलेली संख्या, झालेली बंडखोरी या सर्वांचा विचार केल्यास तिसरा पसंतीक्रमही विजयासाठी लागू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे विजयी निकाल सायंकाळी ५ पर्यंत लागेल, अशी अपेक्षा आहे.