शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हानमध्ये भरदिवसा दरोडा

By admin | Updated: May 15, 2017 02:16 IST

सराफा व्यापाऱ्यावर गोळी झाडून तोंडावर स्कार्फ बांधलेल्या दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लुटून नेला

सराफा व्यापाऱ्यावर गोळी झाडली : २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास लोकमत न्यूज नेटवर्क कन्हान : सराफा व्यापाऱ्यावर गोळी झाडून तोंडावर स्कार्फ बांधलेल्या दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव अमित गुप्ता (वय ४५, रा. कामठी) असे असून, त्यांच्या पायावर गोळी लागल्यामुळे त्यांना जबर दुखापत झाली आहे. रविवारी भरदुपारी कन्हान शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कन्हानच्या गणेशनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुप्ता यांचे अमित ज्वेलर्स नामक सराफा दुकान आहे. रविवारी दुपारी १.४५च्या सुमारास चार अनोळखी तरुण काळ्या रंगाच्या दोन मोटरसायकलींवर आले. त्यांनी दुकानापासून २० फूट अंतरावर महामार्गालगत आपल्या दुचाकी उभ्या ठेवल्या आणि पायी चालत दुकानात शिरले. दोघे दुकानातील काऊंटरजवळ तर दोघे मागे उभे राहिले. अमित गुप्ता यांच्यासमोर एक आणि दुसरा गुप्ता यांच्या शेजारी असलेल्या कर्मचाऱ्याच्या समोर उभा होता. ध्यानीमनी नसताना अचानक दोघांनीही अमित गुप्ता व त्यांच्या कर्मचाऱ्यावर पिस्तूल ताणली. एकाने गुप्ता यांच्याकडे त्यांच्या पायाजवळ ठेवलेल्या पिशव्यांची मागणी केली. त्यात रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने होते. गुप्ता यांनी या पिशव्या देण्यास टाळाटाळ करताच त्याने गुप्ता यांच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे अमित गुप्ता गंभीर जखमी झाले. दहशत निर्माण करण्यासाठी दरोडेखोरांनी हवेत तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे गुप्तांसोबतच त्यांच्या नोकरालाही कापरे भरले. परिणामी त्यांनी विरोध करण्याऐवजी गप्प राहणेच पसंत केले. दरम्यान, मागे उभे असलेल्या दोघांनी लगेच रोख रक्कम व दागिन्यांच्या पिशव्या हिसकावून घेत दुकानाबाहेर पळ काढला. बाजूलाच उभ्या केलेल्या मोटरसायकलींनी ते पळून गेले. दरोडेखोर दूर गेल्याची खात्री पटल्यानंतर गुप्ता आणि त्यांच्या नोकरांनी आरडाओरड केली. परिणामी आजूबाजूची मंडळी धावत आली. त्यांनी जखमी अवस्थेतील गुप्ता यांना कामठीतील एका खासगी रुग्णालयात नेले. पोलिसांनाही फोनवरून माहिती देण्यात आली. त्यामुळे कन्हान शहर पोलीस दलासह जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी धावला. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे कन्हान शहरात दहशत पसरली असून, दिवसाढवळ्या हा धाडसी दरोडा घालणारी टोळी कुठली, त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान, दरोड्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे पोलिसांनी मिळत्या जुळत्या वर्णनांच्या गुन्हेगारांची नागपूर शहर, जिल्हा तसेच आजूबाजूच्या भागातून धरपकड सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर दरोडेखोरांचा छडा लागला नव्हता. दरोडेखोरांना लवकरच पकडू : पोलीस अधीक्षक ज्यावेळी दरोडेखोर दुकानात शिरले. त्यावेळी तेथे स्वत: दुकानमालक गुप्ता, त्यांचे नोकर आणि ग्राहक असे सात ते आठ जण होते. त्यामुळे दरोडेखोरांनी वर पिस्तूल ताणून तीन गोळ्या झाडल्या. तर, एक थेट गुप्ता यांच्या पायावर मारली. काडतुसाच्या चारही पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. सात वर्षात दुसरी घटना सशस्त्र दरोडा टाकण्याची कन्हान परिसरातील ही दुसरी घटना होय. सात वर्षांपूर्वी कन्हान नजीकच्या कांद्री येथील रोकडे ज्वेलर्सवर सकाळी ११ वाजताच्या सुमारास चौघांनी दरोडा टाकला होता. त्यात दरोडेखोरांनी चाकू आणि तलवारींचा वापर केला होता. चौघेही दोन मोटरसायकलींवर आले होते. शिवाय, अंदाजे २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यानंतर सदर दुकान कायमचे बंद झाले. रविवारी दुपारी घडलेल्या घटनेत दरोडेखोरांनी पिस्तूलचा वापर केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दरोडेखोरांच्या हालचाली लक्षात घेता हा दरोडा पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.