नागपूर : नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे नवनियुक्त न्याय दंडाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे, संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, महासचिव अॅड. नितीन तेलगोटे प्रमुख अतिथी होते. सत्कारमूर्ती न्याय दंडाधिकाऱ्यांमध्ये अपूर्वा भासरकर, वैष्णवी ढबाले, अमरीन मोहम्मद कासीम, ऋषिकेश भुयारकर, सागर इंगळे, अश्विनी उजवणे, साज्जुसमन शाहीद, अविनाश ढोके, अपेक्षा बनसोड, मंगला हिवर, प्रियंका पागनानी, वैशाली जोशी, पराग ठाकरे व विनय मेंढे यांचा समावेश आहे. त्यांचा न्यायमूर्ती देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरीन यांना न्यायाधीश करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे त्यांचे वडील गुलाम अब्बास कासीम व न्याय दंडाधिकारी परीक्षेसाठी उमेदवारांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारे न्यायाधीश धवस, अॅड. जे. एम. गांधी, उल्हास औरंगाबादकर, सचिन नारळे, मदन सेनाड, हिमांशी सोनी, नीलेश गायधने, वेणू चावरिया, प्रदीप अग्रवाल, अरुण अग्रवाल, प्रीती चुरड यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. नीलेश गायधने यांनी संचालन केले तर, उज्ज्वल फसाटे यांनी आभार मानले. बाबा भांडेकर, अक्षय समर्थ, नचिकेत व्यास, गिरीश खोरगडे, परीक्षित मोहिते, श्रीकांत गावंडे, समीर पराते, हेमंत कोरडे, मनोज मेंढे, नितीन गडपाले, अर्चना गजभिये आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
नवनियुक्त न्याय दंडाधिकाऱ्यांचा सत्कार
By admin | Updated: October 19, 2015 02:54 IST