शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

कस्तूरचंद पार्कवरच होणार गडकरी यांचा सत्कार

By admin | Updated: May 14, 2017 02:14 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजी कस्तूरचंद पार्कवर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाची परवानगी

कार्यक्रमाला हायकोर्टाची परवानगी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजी कस्तूरचंद पार्कवर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाची परवानगी मागणाऱ्या अर्जावर कार्यवाही करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची परवानगी मागणाऱ्या अर्जावरील कार्यवाहीबाबत न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठाने या अर्जाला मंजुरी देताना, असे निर्देश दिले की, प्राचीन ठेव्याला कोणताही धक्का पोहचू नये, कार्यक्रमानंतर मैदान सुस्थितीत केले जावे. गडकरी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त २७ मे रोजी आयोजित या कार्यक्रमाला झेड प्लस श्रेणीची सुरक्षा असलेले अनेक नेते उपस्थित राहणार असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी अपेक्षित असल्याने गडकरी सत्कार समितीने कस्तूरचंद पार्कची मागणी केली होती. एरवी कस्तूरचंद पार्कवर पारंपरिक कार्यक्रम व्हायचे, या ऐतिहासिक मैदानाचा व्यापारिकदृष्ट्या वापर होत असल्याने अशा कार्यक्रमांवर बंदी असावी, अशा वृत्तपत्रातील बातमीचा जनहित याचिका म्हणून स्वत:हून उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. कस्तूरचंद पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन हे तीन शासकीय कार्यक्रम वगळता आदी समारंभ आणि कार्यक्रमावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहे. कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रशासनाला या मैदानाव्यतिरिक्त इतर कोणतीही जागा योग्य नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता. या जनहित याचिकेतील न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कस्तूरचंद पार्क मैदान आणि प्राचीन ठेव्याला कोणताही धक्का पोहचू नये, अशी मागणी केली. न्यायालयानेही परावनगी देताना आयोजकांना सर्व अटी घालून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.