शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

प्रसन्न स्वरांनी रंगलेला ‘एहसास -ए- गझल’

By admin | Updated: June 2, 2014 02:17 IST

गझल म्हणजे संवेदनशील माणसांच्या हृदयाला हात घालणारा गीतप्रकार.

नागपूर : गझल म्हणजे संवेदनशील माणसांच्या हृदयाला हात घालणारा गीतप्रकार. आशयघन शब्द आणि रागदारीवर आधारित संगीतांचे कोंदण लेवून आलेल्या गझल रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. जगजित सिंग, गुलाम अली, आदी अनेक गायकांच्या आवाजाने अजरामर झालेल्या गझलचा ‘एहसास -ए- गझल’ कार्यक्रम आज चिटणवीस सेंटरच्यावतीने बनयान सभागृहात आयोजित आला. गालिब ते बशीर बद्र, वसीम बरेलवी, साहिर कबीर, अहमद फराज अहमद यांच्यापर्यंंतच्या अनेक भावपूर्ण गझल सादरीकरणाने या कार्यक्रमात रंगत आणली.

प्रसन्न जोशी यांच्या भारदस्त आवाजाने आणि गझलचा अर्थ, आशय समजून केलेल्या सादरीकरणाने तसेच निवेदक श्‍वेता शेलगावकर यांच्या उर्दूमिश्रीत रसिल्या, अभ्यासपूर्ण निवेदनाने या कार्यक्रमाची उंची वाढली. विरह, व्याकुळता, शृंगार आणि प्रेम या सार्‍याच भावनांच्या गझलने यावेळी रसिकांचा ताबा घेतला. सर्वच वादकांनी दिलेली मेलोडियस साथ कार्यक्रमात रंग भरणारी होती. गाजलेल्या रचनांनी प्रसन्नने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि नव्या-जुन्या गझलने रसिकांना जिंकले.

साहिर कबीर हे शायर नागपुरातले. त्यांच्या काही गझला सुप्रसिद्ध गझलगायक जगजीत सिंग यांनी गायिल्या आहेत. तर त्यांचा पुत्र समीर कबीर हे देखील गझलकार आहेत. या दोघांच्याही गझल यावेळी प्रसन्नने तयारीने सादर केल्या. या कार्यक्रमाला समीर कबीर प्रामुख्याने उपस्थित होते. ‘ना मै हिंदु हू ना मुसलमाँ, मुझे जीने दो.., तेरी खुशबु गुलाब जैसी..’ आदी गझल सादरीकरणाने ही रंगत वाढली. या कार्यक्रमाचे संयोजन विजय दमानिया यांनी केले होते.

त्यांच्या हस्ते याप्रसंगी प्रमुख अतिथी मौलाना अमीरुद्दीन मलिक, विष्णू मनोहर, उस्ताद अकील अहमद यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात तबल्यावर डॉ. देवेन्द्र यादव, संवादिनी श्रीकांत पिसे, व्हायोलिन निशिकांत देशमुख आणि किबोर्डवर राहुल मानेकर यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)

रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ.., ठुकराओ या प्यार करो मै नशे मे हुं.., सरकती जाए है रुखसे नकाब अहिस्ता-अहिस्ता’ या लोकप्रिय गझलला रसिकांनी टाळ्यांनी प्रतिसाद देत प्रसन्नाच्या गायनाला दाद दिली. प्रसन्न जोशी शहरातला गुणी गायक आहे. अनेक गझलच्या कार्यक्रमात सादरीकरण करणार्‍या प्रसन्नचा स्वतंत्र असा बहुधा हा पहिलाच कार्यक्रम असावा. त्याच्या भावपूर्ण सादरीकरणाला यावेळी रसिकांनी दाद देऊन गौरवले.