शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसीची घरोघरी भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:07 IST

नागपूर : सोशल मीडियावर जगात सर्वात सक्रिय असलेल्या व्हाॅट्सअ‍ॅपने एक नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपचा ...

नागपूर : सोशल मीडियावर जगात सर्वात सक्रिय असलेल्या व्हाॅट्सअ‍ॅपने एक नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपचा सर्व डाटा फेसबुक व फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर शेअर केला जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा धसका भारतातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप युझर्सनी घेतला आहे. आपण व्हॉट्सअ‍ॅपवर काय काय शेअर केले याचा सर्व फ्लॅशबॅक युझर्सच्या डोळ्यापुढे तरंगायला लागला आहे. खासगीतले हे सर्वकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर तर येणार नाही ना, अशी भीती अनेकांना वाटायला लागली आहे. अनेकजण आता व्हॉट्सअ‍ॅपला दुसरा पर्याय शोधायला लागले आहेत. पण सायबर एक्सपर्टनी व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना काळजी करू नका, असा सल्ला दिला आहे.

- व्हॉट्सअ‍ॅपवरील कुठलीही वैयक्तिक चॅटिंग, शेअर केलेले फोटो अथवा जो काही आपल्याला भीतीदायक वाटत असेल असा कुठलाही डाटा शेअर होणार नाही. कंपनी फक्त व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला डाटा शेअर करणार आहे. फेसबुक याचा वापर अ‍ॅडव्हरटायजिंगच्या दृष्टीने वापर करणार आहे. मेसेजमधील कुठल्याही कंटेन्टला पब्लिकली लीक करणार नाही. आतापर्यंत या कंपन्या डाटा शेअर करीतच आल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने ते अधिकृत केले आहे.

- तेजस अंजनकर, सायबर एक्सपर्ट

- खरे तर कुठल्याही सोशल मीडियामध्ये तुम्ही शेअर केलेला डाटा हा हॅक झालेलाच आहे. सोशल मीडियावरील कंपन्या जो डाटा शेअर करणार आहे, तो वैयक्तिक करणार नाही. व्यवसायाशी निगडित डाटा ते शेअर करणार आहेत. या कंपन्या पूर्वीही तुमचा डाटा वापरतच होत्या. त्या फक्त आता तुम्हाला सांगून वापरत आहेत. तुमच्या मनात जे काळेबेरे चालले आहे ते समाजमाध्यमात येईल अशी जी भीती तुम्हाला आहे, ते बिलकूल होणार नाही.

महेश रखेजा, सायबर एक्सपर्ट

- अनेक व्हॉट्सअ‍ॅप युझर्स आता दुसरा पर्याय शोधायला लागले आहेत. पण सोशल मीडियाचा कुठलाही प्लॅटफॉर्म हा सुरक्षित नाही. व्हॉट्सअ‍ॅपने कमर्शियल डाटा शेअर करणार असे म्हटले आहे. मुळात सर्वच सोशल मीडियाचा बिझनेस मॉड्यूल सारखाच आहे. करोडो युझर्स असलेल्या कंपन्यांना तुमची वैयक्तिक माहिती लीक करण्यात काही रस नाही. मुळात व्हॉट्सअ‍ॅपच्या निर्णयामुळे सोशल मीडियातील युझर्सना स्वत:च्या डाटाबद्दल एक जागरूकता निर्माण झाली आहे. सरकारच्या दरबारात पडलेले डाटा प्रायव्हेसी प्रोटेक्शन बिल यावरून चर्चेत आले आहे. खरे तर सोशल मीडियाचा वाढलेल्या अतिरेकामुळे ‘माय डाटा माय राईट’ ही मूव्हमेंट सुरू व्हायला पाहिजे. आपल्या डाटाचा गैरवापर होऊ शकतो याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. पण खरे सांगायचे म्हणजे सोशल मीडियावरील सर्वच पर्याय सारखेच आहेत.

अ‍ॅड. महेंद्र लिमये, सायबर अवेअरनेस ऑर्गनायझेशन