शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मानसिक परिणाम दूरगामी होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST

-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या ...

-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन

नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत, काहींमध्ये त्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले.

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. समाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोना पश्चात तर मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा जातोय. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे. लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतर वैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे व्यसनाधिनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाण आहे. या बाबी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे मतही या तज्ज्ञानी मांडले.

-भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या

डॉ. गावंडे म्हणाले, २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. प्रति एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहे. वाढत्या स्पर्धेबाबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.

-आत्महत्या केलेल्यांपैकी ८० टक्के व्यक्तींचे यापूर्वीही प्रयत्न

डॉ. निंभोरकर म्हणाले, नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूवीर्ही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. जर असा आत्महत्येचा प्रयत्न केल्या गेला असेल तर, योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते.

-आत्महत्येची पूर्व लक्षणे ओळखा

:: नेहमी उदास राहणे

:: एकटे राहण्यास प्राधान्य

::स्वत:ला ओझं समजणे

:: मनाला असह्य वेदना होणे

:: नकारात्मक विचार अधिक येणे

:: छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड

::अधिक वा कमी झोप

:: मरणाच्या गोष्टी करणे

:: स्वत:ला हानी पोहचविण्याचा प्रयत्न

:: व्यसनाधिनता

-आप्तस्वकीयांशी चर्चा करा!(फोटो घ्यावा)

मनात आत्महत्येचे विचार आले तर आप्तस्वकीयांशी नि:संकोच चर्चा करावी. मानसिकरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. औषधांमध्ये नियमितता ठेवावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत.

डॉ. सुशील गावंडे, अध्यक्ष, सायकॅट्रिक सोसायटी

-लक्षणांना वेळेत ओळखा! (फोटो घ्याव)

आत्महत्येची पूर्वलक्षणे लक्षणे आढळून आली तर निश्चितच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेत लक्षण ओळखून मदत मिळाली तर आत्महत्या टाळू शकते व निश्चितच जीव वाचू शकतो.

डॉ. श्रीकांत निंभोरकर, सचिव, सायकॅट्रिक सोसायटी