शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपालाच कोरोनाची भीती : तीन मोठी इस्पितळे असताना रुग्णाना ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 23:45 IST

बिकट स्थिती असतानाही मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या तीन मोठ्या इस्पितळांना कोरोनासाठी तयार केले नाही. धक्कादायक म्हणजे, मनपाकडे १४५ खाटा आहेत, येथे उपचार घेणारे आजच्या स्थितीत केवळ सहाच रुग्ण आहेत.

ठळक मुद्दे१४५ खाटा रुग्ण केवळ ६ : आरोग्य विभागाची अशीही अनास्था

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूबाधितांची संख्या चार झाली आहे रोज १० वर संशयित रुग्ण आढळून येत आहे. यांच्यावरील उपचारासाठी मेडिकलमध्ये ४० तर मेयोमध्ये २० खाटांचा वॉर्ड आहे. या शिवाय सध्यातरी कुठलीही पर्यायी सोय नाही. खासगी इस्पितळांना ‘आयसोलेशन’ वॉर्ड तयार करण्याचा सूचना केल्या आहेत. परंतु यासाठीही कुणी सामोर आलेले नाही. बिकट स्थिती असतानाही मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या तीन मोठ्या इस्पितळांना कोरोनासाठी तयार केले नाही. धक्कादायक म्हणजे, मनपाकडे १४५ खाटा आहेत, येथे उपचार घेणारे आजच्या स्थितीत केवळ सहाच रुग्ण आहेत. त्यानंतरही आवश्यक सोयी नसल्याचे कारण सांगून मनपा आरोग्य विभाग हात वर करीत आहे.महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अ‍ॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडल्याचे यावरून दिसून येत आहे.मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात खाटांची संख्या ८० आहे. या रुग्णालयात केवळ सहा रुग्ण आहेत. या शिवाय, पाचपावली सुतिका गृह आहे. येथे खाटांची संख्या २५, तर इमामवाडा येथील आयसोलेशन वॉर्डात खाटांची संख्या ४० आहे. परंतु दोन्ही रुग्णालयात एकही रुग्ण नाही. विशेष म्हणजे, या रुग्णालयांच्या देखभालीपासून ते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. रुग्णाला मात्र, याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. अख्खे शहर कोरोना विषाणूच्या दहशतीत असताना एकही रुग्ण या इस्पितळात भरती करून घेतला जात नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे सांगून मनपाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देतील का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. व्हेंटिलेटरचा अभावाचे सोगं कधीपर्यंतधक्कादायक म्हणजे, नागपुरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव असतानाच्या वेळीही मनपाने असेच हात वर केले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आमच्याकडे व्हेंटिलेटर व आवश्यक यंत्रणा नसल्याचे सोंग घेतले आहे. खासगी इस्पितळांकडे मदत मागितली आहेमनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सुतिका गृह व आयसोलेशन वॉर्डात व्हेंटिलेटर, त्यांना चालविणारे तंत्रज्ञ नाहीत. यामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण ठेवणे शक्य नाही. खासगी इस्पितळांकडे मदत मागितली आहे.डॉ. भावना सोनकुसळेआरोग्य उपसंचालक, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या