शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे प्राध्यापकांमध्ये अतिरिक्त ठरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. मात्र नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर ‘एआयसीटीई’च्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांनुसार ‘वर्कलोड’ कमी होऊन अतिरिक्त ठरण्याची भीती प्राध्यापकांमध्ये आहे. मात्र नवीन अभ्यासक्रमाची रचना ही ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड’ असल्याने प्राध्यापक अतिरिक्त ठरणार नाही. उलट काही विषयांच्या प्राध्यापकांचे काम वाढण्याची शक्यता आहे.

‘एआयसीटीई’च्या जुन्या नियमावलीनुसार ‘बीई’ व ‘बीटेक’ या अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांचे गुणोत्तर २० : १ असे होते. म्हणजे २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे गणित होते. मात्र ‘एआयसीटीई’ने यंदा नियमावलीत बदल केला व गुणोत्तर १५ : १ असे झाले आहे. म्हणजेच विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत प्राध्यापकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांतील प्राध्यापकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड’ अभ्यासक्रम राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही महाविद्यालयात प्राध्यापक अतिरिक्त ठरणार नाहीत. विविध उपक्रम राबविण्यासाठी प्राध्यापक लागणारच आहे. ही सर्व बाब विचारात ठेवूनच अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, असे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले.

त्या महाविद्यालयांचा ताण वाढणार

नागपूर विभागात ४७ महाविद्यालये असून, १८ हजार २४० जागा आहेत. ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांना आर्थिक भार सहन करावा लागत असून प्राध्यापकांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. काही महाविद्यालयांत तर आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर उपक्रम राबविण्यासाठी प्राध्यापकांची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील सध्या कार्यरत प्राध्यापकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.