शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर : भेसळीच्या खाद्यपदार्थांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 20:28 IST

भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देमहाप्रसादासाठी नोंदणी करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीच्या दिवसांमध्ये भेसळीचे अनेक प्रकार समोर येतात. विशेषत: गणेशोत्सवामध्ये खव्याचे पेढे आणि मोदक प्रसाद म्हणून वाटले जातात. भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे. गणेशोत्सव मंडळाची नोंदणी करणाऱ्या महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला मंडळाची यादी मागितली आहे, सोबतच मंडळाला परवानगी देताना अन्न व औषध प्रशासनाकडे तशी नोंदणी करण्याची अट घातली आहे.गणेशोत्सव...एक आनंदसोहळा... धार्मिक व्रतवैकल्याचा एक प्रमुख भाग. लहानांपासून थोरांपर्यंत जो तो आपल्या परीने या उत्सवाचा आनंद लुटतो. गणराया आपल्यासोबत तब्बल दहा दिवस राहणार तेव्हा त्याची बडदास्त कशी ठेवता येईल याचेच विचार प्रत्येकाच्या मनात असतात. घरातील सर्व सदस्य एका वेगळ्याच उल्हासाने कामास लागतात. करंज्या, मोदक, लाडू, शंकरपाळे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करायला सुरुवात होते. यात घरातील स्त्रियांचे कौशल्य पणाला लागते. किंवा हॉटेलमधून आणण्याची लगबग सुरू होते. साहजिकच घरात रोज काही ना काही गोडधोड केले जाते. शिवाय आरतीसाठी रोज वेगवेगळी खिरापत म्हणून विविध प्रकारच्या मिठाया व मोदक असतातच. परंतु सर्व काही भक्तिभावाने होत असताना त्यात भेसळीचे विरजण पडते. चीड-मनस्ताप सहन करण्यापलिकडे काहीच उरत नाही. या काळात भेसळीच्या खाद्यपदार्थांना घेऊन तक्रारीही वाढलेल्या असतात. याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारपासून हॉटेलमधील अन्न पदार्थांचे नमुने घेणे सुरू केले आहे. गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे.महाप्रसादावर विशेष लक्षबहुसंख्य गणेशोत्सव मंडळ महाप्रसादाचे आयोजन करते. या महाप्रसादातून विषबाधा होऊ नये याकडे विशेष लक्ष ठेवण्यासाठी मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी ‘एफडीए’ने शुक्रवारी महानगरपालिकेला गणेशोत्सव मंडळाची यादी मागितली आहे. तसेच मंडळांना परवानगी देताना ‘एफडीए’कडे तशी नोंदणी करण्याचे पत्रही दिले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग