शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

नागपुरात मास्कच्या काळबाजारावर एफडीएची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:33 IST

एमआरपीनुसार ‘एन-९५’ मास्कची किमत १५० रुपये असताना २१० रुपयांमध्ये विक्री होत असल्याचे चौकशीत आढळून आल्याने सोमवारी औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) दवाबाजारातील एका सर्जिकल होलसेल विक्रेत्यावर कारवाई केली.

ठळक मुद्देसर्जिकल  होलसेल विक्रेत्यावर आणली बंदी : १५० रुपयाचा मास्क २०० रुपयात विक्रीचे प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एमआरपीनुसार ‘एन-९५’ मास्कची किमत १५० रुपये असताना २१० रुपयांमध्ये विक्री होत असल्याचे चौकशीत आढळून आल्याने सोमवारी औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) दवाबाजारातील एका सर्जिकल होलसेल विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईने मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.कोरोना विषाणूच्या दहशतीचा फायदा घेत काही औषध विक्रेते ‘एन-९५’ मास्कचा काळाबाजार करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली. मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाका, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिले होते. त्यानुसार ‘एफडीए’ कामाला लागले. परंतु त्यांना यश येत नसल्याचे पाहत ‘लोकमत’ने १३ मार्च रोजीच्या अंकात ‘मास्कचा काळाबाजार सुरूच’ या मथळ्याखाली पुन्हा सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. यात दवाबाजारातील एका ‘सर्जिकल स्टोअर्स’ने ‘बॅच क्र. १७०८ जी १७७ एनई’ एन-९५ मास्क ज्याची किमत एमआरपीनुसार १५० असताना ग्राहकाला २०० रुपये व ‘जीएसटी’ १० रुपये असे एकूण २१० रुपये किमतीनुसार पाच मास्क १०५० रुपयात विकल्याचे वास्तव मांडले. याची माहिती पुन्हा जिल्हाधिकारी ठाकरे यांना देण्यात आली. त्यांनी संबंधित विभागाला पुन्हा सूचना केल्या. त्यानुसार, सोमवारी दवाबाजारातील सर्जिकल होलसेल विक्रेत्यांची तपासणी औषध प्रशासनाचे सहआयुक्त पी.एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात एका होलसेल विक्रेत्यावर व एका उत्पादन विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली तर तनुश्री सर्र्जिकल होलसेल विक्रेत्याची खरेदी व विक्रीवर बंदी आणली. या कारवाईने काळाबाजार करणाऱ्यांवर काही प्रमाणात वचक बसण्याची शक्यता आहे.विक्री व खरेदी बंदची कारवाईमास्कचा काळाबाजार होत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने गांधीबाग दवाबाजारातील तनुश्री सर्जिकल या होलसेल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत या स्टोअर्समधून विक्री व खरेदीवर बंदी आणण्यात आली आहे.पी.एन. शेंडेसहआयुक्त, औषध प्रशासन

टॅग्स :corona virusकोरोनाFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग