शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

मुलाच्या अंत्यदर्शनासाठी पित्याची तगमग

By admin | Updated: October 12, 2014 01:15 IST

थकत्या वयातील आई-वडिलांचा तो आधार होता. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. रात्री जेवणाची वेळ झाली तरी तो परतला नाही. मध्यरात्र झाली

बेवारस पुरलेल्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कारनरेश डोंगरे - नागपूरथकत्या वयातील आई-वडिलांचा तो आधार होता. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. रात्री जेवणाची वेळ झाली तरी तो परतला नाही. मध्यरात्र झाली तरी त्याचा पत्ता नाही. स्वाभाविकपणे आई-वडिलांच्या जीवाला घोर लागला. रात्रभर इकडे-तिकडे चौकशी करूनही त्याच्याबद्दल कुणीच काही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे आई-वडील आणि नातेवाईकांचीही काळजी वाढली. शुक्रवारी दिवसभर मित्रांकडे, आप्तांकडे, इकडे-तिकडे सर्वत्र शोध घेऊनही ‘त्याच्या’बद्दल कुणीच काही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे आई-वडिलांचे अवसान गळाले. वडील आणि त्यांच्या आप्तस्वकीयांनी शुक्रवारी सायंकाळी सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. ‘तो’ गुरुवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी ‘त्याचे’ वर्णन नोंदवून घेतले. वय, वर्ण, शरीरयष्टी याची चौकशी झाली. काय करीत होता, कोणते कपडे घालून होता, त्याचीही चौकशी झाली, अन् ‘तो’ बर्मुड्यावर होता, असे सांगताच पोलीस चमकले. पोलिसांनी ‘त्याच्या’ कपड्याची माहिती नातेवाईकांना दिली. ती ऐकून नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला. कपडे तसेच होते. वय आणि शरीरयष्टीही तशीच होती. त्यामुळे ‘तो’ तोच असावा, असे जवळपास स्पष्ट झाले.