शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

पित्याचा खून दडपणार्‍या पुत्रास नाकारला जामीन

By admin | Updated: May 9, 2014 02:43 IST

तब्बल साडेतीन वर्षांपर्यंत जन्मदात्याचा खून दडपणार्‍या एका पुत्राचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

नागपूर : तब्बल साडेतीन वर्षांपर्यंत जन्मदात्याचा खून दडपणार्‍या एका पुत्राचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच याच प्रकरणी सुनेसह तिघांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. पंकज दामोदरराव रघटाटे (३५) रा. ओमनगर, असे आरोपी पुत्राचे नाव आहे. संजय आनंदराव रघटाटे (४५) रा. धंतोली, दीप्ती पंकज रघटाटे (३२) आणि अनिल महादेवराव इखार (४७) रा. वर्धमाननगर, अशी आरोपींची नावे आहेत.,३0 डिसेंबर २0११ रोजी शुक्रवारी तलावात ओमनगर येथील दामोदर सदाशिव रघटाटे (५८) यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल त्यावेळी गणेशपेठ पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानंतर साडेतीन वर्षानंतर नुकताच अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले होते की, २८ डिसेंबर २0११ रोजी मृत दामोदर हे आपला मुलगा पंकज, पुतण्या संजय, पंकजचा मित्र संजय भोकरे आणि जावई अनिल इखार कामठी मार्गावरील रनाळा येथील महाकाली मंदिराजवळ मद्य आणि मटण पार्टीसाठी एमएच -३३-एफ-१ क्रमांकाच्या टाटा सफारीने गेले होते. हे वाहन संजय भोकरे याच्या मालकीचे होते. या ठिकाणी मृत दामोदर यांच्या फ्रेम कारखान्यातील नोकर सुरेश पौनीकर, मित्र यादवराव पराते, रमेश निपाणे, चुडामण कुंभारे, महादेव टाकळीकर आणि पुष्पराज नंदनवार उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर सायंकाळी ७.३0 वाजता सारेच आपापल्या घराकडे निघाले होते. परंतु दामोदर, संजय रघटाटे आणि संजय भोकरे हे छोटा ताजबाग येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास दामोदर यांना त्यांच्या घरी सोडून देण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता मृताचा पुतण्या संजय याने गांधीसागर तलाव गणेश घाट येथे मृताची स्कूटर आणि चपला दिसून आल्याचे कळवले होते. पोलिसांनी जगदीश खरे याच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेतला होता. परंतु तो आढळला नव्हता. दुसर्‍या दिवशी मृतदेह तलावात तरंगताना आढळला होता. शवविच्छेदन अहवालावरून दामोदर यांना झोपेतच त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर मुलगा पंकज, सून दीप्ती आणि इतरांनी मृतदेह तलावात फेकून स्कूटर आणि चपला तलावाच्या काठावर ठेवून आत्महत्येचा देखावा निर्माण केला असावा, अशा दाट संशयावरून खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखला करून पंकजला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास गणेशपेठचे पोलीस निरीक्षक पी. वाय. मेश्राम करीत आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेढे तर आरोपींच्या वतीने अँड. सी. एच. शर्मा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)