शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

खर्रा न दिल्याने जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST

नागपूर : खर्रा आणि ४० रुपये उधार न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने मुलाच्या मदतीने एका युवकावर जीवघेणा हल्ला केला. ही ...

नागपूर : खर्रा आणि ४० रुपये उधार न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने मुलाच्या मदतीने एका युवकावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. जितेंद्र ऊर्फ जितू जनबंधू (४८) आणि रोहित जितेंद्र जनबंधू (२६) अशी आरोपींची नावे आहेत. कपिलनगर येथील रहिवासी २० वर्षीय गौरव अनिल उईके मंगळवारी रात्री ८ वाजता त्याचा मित्र प्रणयसोबत त्याच्या घरासमोर बसला होता. त्याचवेळी जितेंद्र तिथे आला. त्याने गौरवला ४० रुपये उधार आणि खर्रा मागितला. गौरवने देण्यास नकार दिला. यामुळे जितेंद्रने गौरवला दोन झापड मारल्या आणि शिवीगाळ करून निघून गेला. काही वेळानंतर तो पुन्हा आपल्या मुलाला घेऊन आला. दोघांनी त्याच्या डोक्यावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी गौरवला रुग्णालयात दाखल केले. कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून जितेंद्रला अटक केली.

-----------

जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू

नागपूर : रस्ता अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. नर्मदा रमेश तिवारी (७६) रा. नंदनवन झोपडपट्टी या ३ डिसेंबर रोजी मुलासोबत दुचाकीने कामठीला जात होत्या. कपिलनगरातील शारद चौकाजवळ यूटर्न घेताना बाईकला अज्ञात ॲक्टिव्हा वाहनचालकाने धडक दिली. यात तिवारी आणि त्यांचा मुलगा खाली पडले. डोक्याला गंभीर मार बसल्याने तिवारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. कपिलनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

-----------------