शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे ‘फास्टटॅग’ला मुदतवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : टोल नाक्यांवर आवश्यक असलेल्या ‌फास्ट टॅगप्रणालीला याअगोदर दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : टोल नाक्यांवर आवश्यक असलेल्या ‌फास्ट टॅगप्रणालीला याअगोदर दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. देशातील बहुतांश महामार्गांवर हा प्रयोग ८० ते ९० टक्के यशस्वी झाला आहे. जे लोक ‘फास्ट टॅग’प्रणालीत आलेले नाहीत, त्यांनी तात्काळ पावले उचलावीत, कारण आता कुठल्याही स्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी स्पष्ट केले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

‘फास्ट टॅग’प्रणाली ही वाहतूकदारांच्या सोयीसाठीच लागू करण्यात आली आहे. टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत व त्रास होऊ नये यासाठी ही प्रणाली उपयोगाची आहे. १० टक्के लोकांनी अद्यापही ‘फास्ट टॅग’ घेतलेले नाहीत. टोलनाक्यांवरदेखील फास्ट टॅग विक्रीची व्यवस्था आहे. जर फास्ट टॅग घेतले नाही तर यापुढे अशा लोकांना त्रास होईल, असे गडकरी म्हणाले.

पेट्रोल, डिझेलवर होणाऱ्या खर्चात बचतीसाठी ‘सीएनजी’वरील वाहने चालविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’मुळे मोठी बचत होते. विशेषत: ट्रॅक्टर ‘सीएनजी’वर चालविला तर वर्षाला शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये तर सहज वाचतील, असे गडकरी म्हणाले.

पूर्व विदर्भातील वाहने ‘सीएनजी’वर आणणार

पुढील पाच वर्षांत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियासह पूर्व विदर्भातील सर्व सहाही जिल्ह्यातील वाहने ‘सीएनजी’वर चालविण्यावर भर देण्यात येईल. नागपुरात यादृष्टीने कामदेखील सुरू झाले आहे. विशेषत: ट्रॅक्टर, शहर बस, परिवहन महामंडळाच्या बसेस व ऑटोरिक्षा सीएनजीवर चालविण्यात येतील. त्यामुळे लोकांची इंधनावरील खर्चात बचतदेखील होईल व प्रदूषणदेखील कमी होईल. उपराजधानीतील महापौर, नगरसेवक, अधिकाऱ्यांची वाहनेदेखील ‘सीएनजी’वर चालतील, असे गडकरी यांनी सांगितले.