शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणातील उपवास महागला; शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे पाच रुपयाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्यात साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला जास्त मागणी असते. त्यामुळे बाजारात आवकही वाढते आणि ...

नागपूर : व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्यात साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला जास्त मागणी असते. त्यामुळे बाजारात आवकही वाढते आणि भावही वाढतात. यंदा साबुदाणा, शेंगदाणा, भगर, राजगिऱ्याच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयाची तेजी झाली आहे. गुजरात व मध्य प्रदेशातून होणारी शेंगदाण्याची आवक काही दिवसापासून घटत असून, ऐन श्रावणात शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे जाणवत आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने त्याचे दरही वाढले आहेत. साबुदाणा दरातील तेजीही कायम असल्याने श्रावणातील उपवास महागडा ठरत आहे.

बाजारात नवीन शेंगदाण्याची आवक होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. यंदा गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे शेंगदाणा पिकाचे नुकसान झाले आहे. आवक चांगली असली तरीही भाव वाढले आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने शेंगदाण्याचे दर तेजीत राहणार आहेत.

किरकोळ किराणा बाजारात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ५५ रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे १० ते १५ रुपये वाढ झाली आहे. श्रावणात येथील नागपूर बाजारात १५० टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. तर एक महिन्यापूर्वी शेंगदाण्याचे दर १०० रुपये होते. सध्या ११५ रुपये किलो भाव आहेत. या महिन्यात जवळपास २०० टन शेंगदाण्याची विक्री होते. तर १०० रुपये किलो असणारी भगर किलोमागे १५ रुपयांनी वधारून भाव ११५ रुपयांवर पोहोचले आहेत. श्रावणात ८ ते १० टन भगरीची आवक होते. राजगिऱ्यातही ५ रुपये किलोने वाढ झाली आहे. ८० ते ९० रुपये किलो दर आहेत. पेंडखजूरही दर २०० रुपये किलोवर गेले आहेत.

असे वाढले दर (किरकोळ दर, एक किलो)

श्रावणाआधी आता

साबुदाणा ५५ ६५

नायलॉन साबुदाणा ७० ८०

शेंगदाणे १०० ११५

भगर १०० ११५

शेंगदाण्याचे दर का वाढले :

आवक घटली, मागणी वाढली

नागपुरात मुख्यत्वे शेंगदाण्याची ८० टक्के आवक गुजरातमधून होते. पण यंदा पावसामुळे बरेच पीक खराब झाले आहे. त्यामुळे यंदा पुरवठ्याच्या तुलनेत आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. पांढरे शेंगदाणे प्रति किलो ११५ रुपये आणि लाल शेंगदाण्याचे १२५ ते १३० रुपये भाव आहेत.

साबुदाण्याचे दर का वाढले :

साबुदाण्याची सर्वाधिक आवक तामिळनाडूमधून होते. साबुदाणा निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल यंदा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. एक महिन्यापूर्वी ५५ रुपये किलो असलेले भाव सध्या ६० ते ७० रुपये आहेत. शिवाय नायलॉन साबुदाणा ८० ते ९० रुपयांदरम्यान आहे.

भगरचे दर वाढले

श्रावण महिन्यात पोटाचे आजार टाळण्यासाठी अनेक जण साबुदाण्याऐवजी भगरीला महत्त्व देतात. यंदा श्रावणात आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. एक-दीड महिन्यापूर्वी १०० रुपये किलोवर असलेले भाव सध्या ११५ ते १२० रुपयांवर गेले आहेत.

मागणी दुप्पट वाढली

श्रावण महिन्यात साबुदाणा, शेंगदाणे, भगर या उपवासाच्या वस्तूंना दुप्पट मागणी असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव वाढले आहेत. यंदाही साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीचे भाव प्रति किलो १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. भाववाढीनंतरही लोकांची खरेदी वाढली आहे.

प्रभाकर देशमुख, व्यापारी