शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायप्रविष्ट प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करा

By admin | Updated: March 21, 2017 02:00 IST

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत विभागात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करा.

अपर आयुक्त अरुण उन्हाळे : दक्षता व नियंत्रण समितीची बैठक नागपूर : अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत विभागात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करा. अनुसूचित जाती-जमाती यांच्या संदर्भातील राज्यस्तरावरील माहिती प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर यांना द्यावी तसेच त्यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करावा, अशा सूचना विभागीय अपर आयुक्त अरुण उन्हाळे यांनी दिल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे सोमवारी विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक अपर आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, नागपूर विभागाचे पोलीस अधीक्षक, महानगरपालिका, जिल्हा परिषद, घरकूल विभाग, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.या आढावा बैठकीमध्ये अनुसूचित जाती-जमातीवर झालेल्या गुन्ह्यांची तपासणी तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे यांची नागपूर विभागातील जिल्हानिहाय माहिती सादर करण्यात आली. तसेच रमाई आवास योजना, परमवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वााभिमान योजना, कर्ज वसुली, जमिनीची मागणी, जमीन वाटप सद्यस्थिती, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीकरिता शासकीय जमीन उपलब्धतेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांपैकी पोलीस तपासावर असलेल्या गुन्ह्यांमध्ये नागपूर विभागात एक वर्षापेक्षा जास्त कालावधीतील पोलीस तपासावर एकूण २५ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी सहा महिन्याच्या पुढील सहा, तीन महिन्यांच्या पुढील २२ गुन्हे नोंद आहेत तसेच तीन महिन्यांचे आतील पोलीस तपासावर एकूण ४४ गुन्हे आहेत. या सर्व गुन्ह्यांचा मार्चअखेरपर्यंत निपटारा करण्याचे निर्देश अपर आयुक्त अरुण उन्हाळे यांनी दिले. तसेच रमाई आवास (घरकूल) योजनेचे बांधकाम व खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला. मार्चअखेरपर्यंत घरकूल योजनेचे उद्दिष्ट जास्तीत जास्त करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.समाज कल्याण उपायुक्त माधव झोड यांनी प्रास्ताविकात विभागातील नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात तसेच यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल बैठकीत सादर केला.(प्रतिनिधी)