शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन गेली अन् ‘सागर’ तळमळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे / अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर/उमरेड : आपली शेतजमीन प्रकल्पात गेली. त्याचा भरीव मोबदला आणि नोकरी ...

नरेश डोंगरे / अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर/उमरेड : आपली शेतजमीन प्रकल्पात गेली. त्याचा भरीव मोबदला आणि नोकरी मिळेल, अशी त्याला आशा होती. त्यासाठी २४ वर्षांपासून तो लढत आहे. सरकारी यंत्रणेशी लढताना त्याचा अस्थिभंग झाला अन् तो दिव्यांगही झाला. मात्र त्याला पाहिजे तो मोबदला मिळाला नाही आणि नोकरीही मिळाली नाही. बधिर प्रशासनाच्या कानांवर आपली हाक जात नसल्याचे पाहून त्याने मुंबईत फोन करून चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडाली. तिकडे मुंबईत गुन्हा दाखल झाला; तर इकडे उमरेड पोलीस ठाण्यात सागर काशीनाथ मांढरे या शेतकऱ्याची पोलिसांनी चौकशी चालविली आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेडपासून १० किलोमीटर अंतरावर मकरधोकडा गाव आहे. सागर काशीनाथ मांढरे यांची मकरधोकडा शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन होती. या जमिनीचा सौदा काशीनाथ मांढरे यांनी तीन वेगवेगळ्या लोकांसोबत केला. दरम्यान, येथे कोळसा खंदाणीसाठी शेतजमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्यांच्या नावावर शेतीचे विक्रीपत्र होते, त्यांना सरकारने मोबदला दिला आणि प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीही दिली. या प्रकल्पात आपल्या मालकीची २७ गुंठे शेतजमीन गेल्यामुळे आपल्यालाही मोबदला मिळावा आणि प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळावी, अशी १२ वीपर्यंत शिकलेल्या सागरची अपेक्षा होती. मात्र त्याला ना नोकरी मिळाली, ना मोबदला. त्यामुळे ‘सागरचा जीव तळमळला.’ त्याने आपला कायदेशीर लढा सुरू केला.

२७ गुंठे शेतजमीन घेणाऱ्या शासन आणि वेकोलीने आपल्याला (आता आपल्या मुलाला) नोकरी द्यावी म्हणून त्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडे दाद मागितली. जमीन मोजणीसाठी अर्जसुद्धा केला. त्यानंतर वेकोली तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालयापर्यंत अर्ज, तक्रारी केल्या. त्या दुर्लक्षित झाल्याची भावना झाल्यानंतर आत्महत्या करण्याचाही इशारा दिला. (यावरून पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर कारवाईसुद्धा केली.) मात्र त्याला दाद मिळाली नाही. न्याय्य मागणीसाठी सरकारी अधिकारी कार्यालयाचे उंबरठे आणि स्वतःचे तारुण्य झिजविणाऱ्या सागरला काहीही हाती लागले नाही. हो, त्याला सततची पायपीट आणि तणावामुळे अस्थिभंग होऊन दिव्यांगत्व आले. त्यामुळे तो प्रचंड वैफल्यग्रस्त झाला. याच वैफल्यग्रस्ततेतून त्याने रविवारी फोन करून थेट मंत्रालयच उडवून देण्याची धमकी दिली. त्याच्या या धमकीने राज्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. खडबडून जागे झालेल्या सुरक्षा यंत्रणेने सागरविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल केला; तर इकडे उमरेडमध्ये त्याची चौकशी सुरू आहे.

---

ही तत्परता आपल्यासाठी का नाही?

एक फोन केल्याबरोबर कारवाईसाठी तत्परता दाखविली जाते. मात्र, आपली २७ गुंठे शेतजमीन घेणाऱ्या सरकारने आपल्याला न्याय देण्यासाठी इतकी वर्षे अशी तत्परता का दाखवली नाही, असा प्रश्न सागर विचारत आहे. त्याच्या फोनमुळे प्रशासनाला हादरा बसला आहे; तर त्याचा प्रश्न संबंधित वर्तुळात सन्नाटा निर्माण करणारा ठरला आहे.

---

अशी होती शेतजमीन

काशीनाथ उपासराव मांढरे यांच्या नावाने एकत्रीकरण योजनेमध्ये गट नंबर ३२६/१, आराजी १.६२ हे. आर. आणि गट नंबर ३२७/३, आराजी १.२१ हे. आर. दर्ज होती. पुनर्मोजणी योजनेत दोन्ही गट नंबर मिळून नवीन भुमापन क्र. ५९६, आराजी २.६३ हे. आर. कायम करण्यात आली. यानंतर त्यांची शेती जितेंद्र गुंगाराम झाडे (०.८१ हे. आर.), राहुल परसराम येवले (०.९७ हे. आर.) आणि भारती हरिश्चंद्र झाडे यांना ०.८५ हे. आर. विक्री केली. आता या संपूर्ण जागेवर धुरे मोक्यावर अस्तित्वात नाही. केवळ मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसून येत असल्याने मोजणी करणे अशक्य असल्याचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाने दिल्याचे समजते.

---