शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील याचा भरवसा नाही. अशावेळी पिके वाचविण्यासाठी विहीर व इलेक्ट्रिक माेटरपंप शेतकऱ्यांच्या कामी येते. मात्र, बाेरडा (ता. रामटेक) शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर काही महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार केली. परंतु, महावितरण कंपनीचेे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाेरडा येथील काही शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली असून, काहींनी राेवणी करण्यासाठी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. खरं तर इतर पिकांच्या तुलनेत धानाच्या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पऱ्ह्यातील धानाची राेपटी जगवण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंंबून राहावे लागत आहे. पावसाने तीन-चार दिवस दडी मारल्यास पऱ्ह्यातील राेपटी सुकायला सुरुवात हाेते. अशावेळी शेतकरी विहिरीतील पाण्याचा वापर करतात.

देवरी-बाेरडा शिवारातील ट्रान्सफार्मवर बाेरडा शिवारातील ५० शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीजपुरवठा दिला आहे. ट्रान्सफार्मरमध्ये पाच महिन्यापूर्वी बिघाड निर्माण झाल्याने विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी केली. परंतु, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे अद्यापही लक्ष दिले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

...

बिलांची वसुली आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष

या भागातील विजेच्या बहुतांश तारा लाेंबकळलेल्या आहेत. त्या तारांचे आपसात घर्षण हाेत असल्याने शाॅर्ट सर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. प्रसंगी स्पार्किंगमुळे तारा तुटतात व धाेका उद्भवताे. बहुतांश शेतकऱ्यांनी पदरमाेड करून खासगी व्यक्तीकडून ही दुरुस्तीची कामे काही प्रमाणात केली. महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून विजेच्या अवाजवी बिलाची नियमित वसुली करते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.