शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

कामठी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी ...

कामठी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले. भिलगाव येथे ई-पीक पाहणी योजनेंतर्गत आयोजित कार्यक्रमात हिंगे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवीन ई-पीक पाहणी अ‍ॅप तयार केला आहे. याअंतर्गत स्मार्ट मोबाईलमध्ये शेतकऱ्यांनी अ‍ॅप स्थापित करून त्याची योग्य माहिती भरली तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पेरणी केलेल्या विविध पिकाची माहिती पारदर्शक पद्धतीने ७/१२ मध्ये नोंदणी होते. याचा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी उपयोग होतो.

एखाद्या नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे फोटो टाकल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होणार आहे. माहिती वेळेवर आणि अद्यावत झाल्याने रासायनिक खते, कीटकनाशके उपलब्धता आणि विविध पिकांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी नियोजनासह विविध विषयाची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग करता येणार आहे. या प्रकल्पासाठी नागपूर विभागातून कामठी तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन हिंगे यांनी केले. सध्या तालुक्यात २,४९२ शेतकऱ्यांनी पीक योजनेची नोंदणी केली आहे. भिलगाव येथे मंडळ अधिकारी महेश कुलदीप पवार, संजय कांबळे, संजय अनवाणे, पटवारी राहुल भुजाडे, नितीन उमरेडकर, ज्योती शिरभाते, शुद्धोधन काळपांडे व शेतकरी उपस्थित होते.