शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी माेहरीचे लागवड क्षेत्र वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : वन्यप्राणी माेहरीच्या पिकाचे इतर पिकांच्या तुलनेत कमी नुकसान करते. शेतकऱ्यांनी गट तयार करून माेहरीच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : वन्यप्राणी माेहरीच्या पिकाचे इतर पिकांच्या तुलनेत कमी नुकसान करते. शेतकऱ्यांनी गट तयार करून माेहरीच्या पिकाचे लागवड क्षेत्र वाढविल्यास शेतमाल बाजारपेठेचा प्रश्न सुटू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढीलवर्षी माेठ्या प्रमाणात माेहरीची पेरणी करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भाेसले यांनी अंबाेला (ता. नरखेड) येथे माेहरी शेतीदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात केले.

लक्ष्मण महल्ले (रा. अंबाेला) यांनी त्यांच्या शेतात माेहरीची पेरणी केली आहे. त्यामुळे अखील भारतीय समन्वित जवस व माेहरी संशाेधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर यांच्यावतीने लक्ष्मण महल्ले यांच्या शेतात माेहरी शेतीदिन व पीक पाहणी कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयाेगी अधिष्ठाता डाॅ. अरुण इंगाेले, डाॅ. बिना नायर, माेहरी कृषीविद्यवेत्ता डाॅ. स्वप्निल ठाकरे उपस्थित हाेते.

डाॅ. बिना नायर यांनी शेतकऱ्यांना जवस व माेहरीच्या तेलाचे मानवी आहारातील महत्त्व समजावून सांगत जवसाच्या वाणाबाबत मार्गदर्शन केले. माेहरी पैदासवार डाॅ. संदीप कामडी यांनी प्रास्ताविकातून माेहरीच्या पिकाला विदर्भातील वातावरण उपयुक्त असल्याचे सांगत माेहरी हे कमी खर्चाचे व अधिक उत्पादन देणारे पीक असल्याचे सांगितले. शिवाय, माेहरीचे विविध वाण व बाजारपेठ याबाबत माहिती दिली. डाॅ. स्वप्निल ठाकरे यांनी माेहरीचे लागवड तंत्रज्ञान, शरद भुरे यांनी माेहरीच्या पिकावरील राेग व कीड तसेच त्यांचे नियंत्रणाबाबत माहिती दिली. पंकज महल्ले यांनी माेहरीचे एकरी १० क्विंटल उत्पादन कसे घ्यायचे, ते प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमाला स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित हाेते.