पालकमंत्र्यांशी चर्चा :धनादेश मिळाल्यानंतरच माघारनागपूर : संघ मुख्यालयासमोर आत्मदहन करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊ न आदोलन उधळल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासून संविधान चौकात उपोषणाला सुरुवात केली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोडगा न निघाल्याने सोमवारी भर पावसात आंदोलन सुरूच होते.२०१४-१५ च्या कापूस हंगामात सेलू (जि.वर्धा) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी श्रीकृष्ण जिनिंग व प्रेसिंगचे संचालक सुनील टालाटुले यांना २० हजार क्विंटल कापूस विकला. मात्र टालाटुले यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे आठ कोटी हडपल्याचा आरोप आहे. या संदर्भात गुन्हा दाखल केला परंतु सेलू पोलिसांनी त्यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. टालाटुले यांचे सरसंघचालक आणि सरकारमधील बड्या नेत्यांशी जवळचे संबंध आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासन तसेच सरकारक डे वारंवार मागणी करूनही टालाटुले यांच्याविरोधात कोणतीच कारवाई होत नसल्याने शेकडो शेतकरी भारतीय किसान खेतमजूर काँग्रेसच्या नेतृत्वात संविधान चौकात उपोषण सुरू केले आहे. यात भारतीय किसान खेतमजूर काँग्रेसचे प्रभारी अविनाश काकडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे(वर्धा), रामू पाठक, मंगेश ढोणे, गोविंद पेठकर, प्रमोद तडस, प्रशांत बोरीकर, सुदाम पवार, विठ्ठल झाडे, बाबाराव ठाकरे आदींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. कापसाच्या पैशाचे धनादेश मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
भर पावसात शेतकऱ्यांचे उपोषण
By admin | Updated: March 1, 2016 02:45 IST