शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झालेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:20 IST

यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे.

ठळक मुद्देउत्पादकांचा दावा : हायकोर्टातील प्रकरणात मध्यस्थी अर्ज

आॅनलाईन लोकमतनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे. ही  संघटना कीटकनाशके उत्पादकांची आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित असून त्यात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी संघटनेने अर्ज दाखल केला आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे. कीटकनाशके वापरामध्ये भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. त्यावरून भारतात कीटकनाशकाचा अतिरिक्त उपयोग केला जात नसल्याचे स्पष्ट होते. बाजारात विकल्या जाणारया कीटकनाशकासोबत संबंधित कीटकनाशक कसे वापरायचे याची माहिती पुस्तिका दिली जाते. त्यामुळे कीटकनाशक उत्पादकांवर निष्काळजीपणाचा आरोप केला जाऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी मृत्यूस कीटकनाशक कारणीभूत असल्याचा एकही वैद्यकीय पुरावा अद्याप पुढे आलेला नाही. परिणामी शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झाले , असे म्हणणे चुकीचे आहे. राज्यात कीटकनाशक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा दावाही निराधार आहे असे फेडरेशनने अर्जात म्हटले आहे.कापुस उत्पादनात यवतमाळ आघाडीवरराज्यामध्ये कापुस उत्पादनात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात ४ मिलियन हेक्टर्समध्ये कापसाचे पिक घेतले जाते. त्यापैकी ०.५ मिलियन हेक्टर शेती एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. जगातील कापुस उत्पादनात भारताचा वाटा २६ टक्के आहे. २००० ते २०१६ या काळात भारतातील कापसाचे उत्पादन २५० टक्क्यांनी वाढले आहे. जगात एकाही देशाला अशी प्रगती करता आलेली नाही  , अशी माहिती फेडरेशनच्या अर्जात देण्यात आली आहे.काय म्हटलेय जनहित याचिकेतयासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शेतकºयांच्या मृत्यूंची न्यायिक आयोग किंवा विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व कंपन्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, मयत शेतकरयांच्या कुटुंबीयांना २० लाख तर, प्रभावित शेतकरयांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे कामकाज पहात आहेत.