शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

शेतकऱ्याची रोकड पळविली

By admin | Updated: December 20, 2015 02:56 IST

एका शेतकऱ्याची दीड लाखाची रोकड लुटारूने हिसकावून नेली. नंदनवनमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली.

दीड लाख लंपास : नंदनवनमध्ये दिवसाढवळ्या घटना नागपूर : एका शेतकऱ्याची दीड लाखाची रोकड लुटारूने हिसकावून नेली. नंदनवनमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची बजबजपुरी झाली आहे. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून, त्यांनी आज या शेतकऱ्याची रक्कम हिसकावून नेतानाच त्याच्या कुटुंबीयांवर जोरदार मानसिक आघात केला आहे. आसाराम वडगूजी फुलझेले असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. ते उमरेड मार्गावरील सेनापतीनगरात राहतात. त्यांची शेती गोसीखुर्द प्रकल्पात गेली असून, उदरनिर्वाहासाठी सध्या ते सेंट्रिंगचे काम करतात. शेतीची काही रक्कम त्यांनी अलाहाबाद बँकेत जमा केली आहे. मुलाचे शैक्षणिक शुल्क भरायचे असल्यामुळे फुलझेले यांनी शनिवारी दुपारी बँकेतून १ लाख ६० हजारांची रक्कम काढली. ती पिशवीत घालून सायकलने ते आपल्या घराकडे निघाले. माता मंदिराजवळ आले असताना सायकल जाम झाल्याने ते खाली उतरले. सायकलच्या चेनमध्ये सुतळी अडकून दिसल्याने ती काढण्यासाठी ते खाली वाकले. तेवढ्या वेळेत लुटारूने त्यांच्या सायकलच्या हॅण्डलला लटकवलेली १ लाख ६० हजारांची रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढला. या घटनेमुळे फुलझेले यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. एका गरीब शेतकऱ्याची रोकड दिवसाढवळ्या लुटल्याचे कळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या नावाने शिमगा केला. गेल्या काही महिन्यांपासून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूचे गुत्ते, जुगार अड्डे, मटक्याचे अड्डे बिनोबोभाट सुरू आहे. पोलीस ठाण्यातून परवानगी मिळाल्याप्रमाणे समाजकंटक अवैध धंदे करीत असून, त्यामुळे व्यसनाधीन गुन्हेगार आपला शौक पूर्ण करण्यासाठी बेधडक गुन्हे करीत आहेत. रोजच छोट्या मोठ्या चोऱ्या, घरफोडीच्या घटना घडतात. पोलिसांची कार्यपध्दत माहीत असल्यामुळे अनेक जण तक्रार देण्याचेही टाळतात. त्यामुळे या भागातील गुन्हेगार कमालीचे निर्ढावले असून, त्यातीलच लुटारूने फुलझेले यांची रोकड लंपास केली. (प्रतिनिधी)