शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: December 16, 2015 03:27 IST

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम आदमी पार्टीने मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढला होता. या मोर्चात वर्धा ..

‘आप’चा मोर्चा : मेयो रुग्णालयात उपचार सुरू, शेतकरी वर्धा जिल्ह्यातील शिरपूरचानागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम आदमी पार्टीने मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढला होता. या मोर्चात वर्धा जिल्ह्यातील पुंडलिक बालाजी ठाकरे या शेतक ऱ्याने मोर्चा स्थळावर किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याला ताबडतोब मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेतकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती आहे. शेतीला पाणी देऊ शकत नसल्याच्या विवंचनेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सामोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेला पुंडलिक बालाजी ठाकरे (६०) यांची वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील शिरपूर येथे दोन एकर शेती आहे. विकसनशील शेतकरी म्हणून ते गावात प्रसिद्ध आहे. शेतात त्यांनी शेततळे तयार करून, त्यात ते मासेपालनही करीत होते. सद्या त्यांनी शेतीत भाजीपाला लावला आहे. शेततळ्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून त्यांनी बोअर खोदली होती. पाण्याची सोय झाल्यामुळे त्यांनी महावितरणकडे विजेसाठी अर्ज केला होता. अनेक खटापटीनंतर शेतात वीज पोहचली. परंतु काही दिवसांपूर्वी शेतातील विजेचा खांब कोसळल्याने, वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडे तक्रारी करूनही वीज पुरवठा सुरू झाला नाही. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना, वीज नसल्यामुळे पाणी देऊ शकत नसल्याने ते त्रस्त होते. दुसरीकडे शेततळ्यातील मासे मृत पावत होते. महावितरणच्या कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा दखल घेण्यात आली नाही. कर्जबाजारी होऊन शेती केल्यानंतरही केवळ पाण्याअभावी नुकसान होत असल्यामुळे ते अस्वस्थ झाले. घरी नागपूरला जात असल्याचे सांगून, दोन दिवसापूर्वी ते नागपुरात आले. मंगळवारी ते ‘आप’ च्या मोर्चात सहभागी झाले. मोर्चा श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स पॉर्इंटवर आल्यानंतर, आपच्या पदाधिकाऱ्यांचे भाषण सुरू होते. अशातच कस्तूरचंद पार्कच्या भिंतीजवळ एक माणूस पडल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसासह आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी आॅर्गनिक फास्फोरस पिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा शेतकरी आपचा समर्थक असल्याची माहिती दिली.