शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या शेतकºयांचा सिंचन विभागात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:09 IST

धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी,

ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिदोरी आंदोलनाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरणातील पाणी गळतीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी अमरावतीतील नुकसानग्रस्त शेतकºयांनी थेट नागपूर गाठले आणि विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांच्या कॅबीनमध्येच ठिय्या मांडला. यावेळी या शेतकºयांनी सोबत आणलेली शिदोरी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयातच उघडली आणि जेवणही उरकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या नुकसानग्रस्त शेतकºयांनी केलेल्या या शिदोरी आंदोलनाने अधिकाºयांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. अखेर अधीक्षक अभियंता पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांशी चर्चा करून लवकरच नुकसानभरपाईसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.मौजा सोनगाव, कळमगाव ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती येथील मौजा सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतात साचल्याने तेथील १७ शेतकºयांच्या पिकांचे व संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना १४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळायची आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात या शेतकºयांनी गेल्या ३ एप्रिल रोजी अमरावती येथे बैलबंडी आंदोलन केले होते. त्यावेळी ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. परंतु चार महिने लोटूनही निधी मिळाला नाही. तेव्हा हे शेतकरी पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी निधी नागपुरातील सिंचन कार्यालयात अडकून पडला असल्याचे सांगितले. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत यांच्या नेतृत्वात वाल्मिक लोखंडे व इतर शेतकºयांनी सोमवारी नागपुरातील सिंचन विभागात येऊन थेट कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात ठिय्या दिला. कार्यकारी संचालक सुर्वे हे सध्या मुंबईला बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे ते कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी त्यांच्या कॅबीनमध्येच ठाण मांडले. येताना त्यांनी आपल्यासोबत आणलेली शिदोरी सोडली व जेवण केले. दरम्यान आमचा निधी कधीपर्यंत दिला जाईल, हे एखादा जबाबदार अधिकारी सांगत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका या शेतकºयांनी घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता डॉ. पी.के. पवार यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे लेखी आश्वासनही दिले. यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अमित अढाऊ, दयाल राऊत, वाल्मिक लोखंडे, संकेत दुरुगकर, प्रशांत मोहोड, प्रवीण मोहोड, विलास आसोले, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी सहभागी होते.धरणाला तडे, चौकशी व्हावीसोनगाव शिवणी येथील धरण बांधून दोन वर्षे झाले. दोन वर्षातच धरणाला तडे गेले असून पाणी पाझरत आहेत. कंत्राटदारही पळून गेला आहे. या धरणाचे काम अतिशय निकृष्ट झाले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी यावेळी केली.नियामक मंडळाची मंजुरी मिळताच निधीकालवा दुरुस्ती अंतर्गत २५ लाख रुपयापर्यंतचे अधिकार मंडळाला आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला असून मंजुरीही मिळालेली आहे. १४ लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई निधी आहे. परंतु त्यासाठी नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी मिळताच हा निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या स्वाधीन केला जाईल.- डॉ. पी.के. पवारअधीक्षक अभियंता, विदर्भ पाटबंधारे विभाग