शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी समुपदेशन केंद्र उभारणार- रविप्रकाश दाणी

By admin | Updated: February 5, 2016 02:08 IST

शेतकरी समुपदेशन केंद्रासाठी कुलगूरू रविप्रकाश दाणी शासनाला प्रस्ताव पाठवणार.

अकोला: सातत्याने होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या बघता, त्यांना अप्रिय निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज असून, अकोल्याला असे शेतकरी समुपदेशन केंद्र (अँग्रो कौन्सेलिंग सेंटर) मिळावे, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी शुक्रवारी दिली. शेतकरी आत्महत्येचे लोण संपूर्ण राज्यात पसरले आहे. त्यांना या टोकाच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांचे सूक्ष्म समुपदेशन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नैराश्य आलेल्यांपैकी काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यांच्या नैराश्येची पातळी शेतकर्‍यांच्या पत्नीच्या लक्षात आलेली असते. अशा शेतकर्‍यांचे समुपदेशन केंद्रातील तज्ज्ञाकरवी केल्यास त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे निश्‍चितच सोपे होईल. त्यासाठी शेतकरी समुपदेशन केंद्र आवश्यक आहे. दीक्षांत समारंभाला येत असलेल्या मंत्रिमहोदयांकडे ही मागणी करणार असल्याचे डॉ. दाणी यांनी दीक्षांत समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सेंद्रिय उत्पादनांना परदेशात चांगली बाजारपेठ आहे; परंतु या उत्पादनांची गुणवत्ता तपासून परदेशात पाठवण्यासाठी योग्य परीक्षणाची गरज असते. हे परीक्षण करण्यासाठी या कृषी विद्यापीठाला सर्टिफिकेशन एजंसी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. येथे परीक्षण झाले तर विदर्भातील सेंद्रिय पदार्थ, उत्पादनाला वाव मिळेल. पारंपरिक पद्धतीने माती परीक्षणास वेळ लागत असल्याने झटपट माती परीक्षण करू न देणारे लेझर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यासाठीचा करार अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केल्याचेही ते म्हणाले. कृषी विद्यापीठाच्या एके-५ व एके-७ या देशी कपाशीच्या जाती कोरडवाहू क्षेत्रात चांगले उत्पादन देत असल्याने, त्यांच्या बियाणे निर्मितीवर भर देण्यात येत असून, बुलडाणा जिल्ह्यातील आप्पासाहेब गुंजकर यांनी या देशी कापसाच्या बियाणे निर्मितीला सुरुवात केली आहे. विद्यापीठाला कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या गुडधी विभागांतर्गत येणारा नाला व वणी रंभापूर येथील मुख्य बिजोत्पादन केंद्रांतर्गत जलयुक्तशिवार कार्यक्रमाची कामे केली जाणार असल्याचे ते म्हणाले.