शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अहवालापूर्वीच भाडेवाढ!

By admin | Updated: May 30, 2017 01:27 IST

महापालिकेच्या जागांवरील ओटे व गाळे वापरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

तर मग दटके समिती कशासाठी ? ओटे व गाळ्यांसाठी आता रेडिरेकनरनुसार भाडे आकारणी बंगाले यांच्या सूचनेमुळे अधिकारी संंभ्रमातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या जागांवरील ओटे व गाळे वापरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु यावर व्यापाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले होते. व्यापाऱ्यांची मागणी विचारात घेता वाजवी शुल्क आकारण्यासाठी सभागृहाने माजी महापौर प्रवीण दटके यांची समिती गठित केली होती. समितीने व्यापाऱ्यांशी चर्चा केली. याबाबतचा अहवाल महापौरांना सादर केला जाणार आहे. परंतु समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी गाळेधारकांकडून रेडिरेकनरनुसार भाडे आकारण्याची सूचना सोमवारी समितीच्या बैठकीत केली. यामुळे अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. बैठकीत झोननिहाय असलेली महापालिकेची किती दुकाने, ओटे व खुल्या जागा याचा आढावा घेण्यात आला. रस्त्यांवर भरणारे बाजार, वाहतूक कोंडी, अनाधिकृत बाजार भरवणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेचा शोध घेणे, रस्त्यांवर भरणाऱ्या बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी, यावर चर्चा करण्यात आली. परंतु दटके समितीच्या अहवालापूर्वी भाडेवाढीला उपस्थित सदस्यांनी विरोध केला नाही. समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वी गाळयांच्या भाडेवाढीची सूचना करण्यात आली. याप्रसंगी उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्या ज्योती भिसीकर, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहिम, उपायुक्त रवींद्र देवतळे, बाजार समितीचे डी.एम. उमरेडकर उपस्थित होते.स्थापत्य समितीला अधिकारच नाहीमहापालिका नियमानुसार महापालिकेच्या मालकीचे ओटे व गाळे यावर भाडे आकारणीचा अधिकार स्थायी समितीला आहे. त्यानुसार स्थायी समितीने भाडेवाढीचा निर्णय घेतला होता. परंतु व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवून आंदोलने केली. याची दखल घेत व्यापाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी सभागृहाने प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. त्यानुसार दटके यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा के ली. ते लवकरच याबाबतचा अहवाल महापौरांना सादर क रणार आहे. त्यानंतर भाडे आकारणीबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. महापालिकेच्या विषय समित्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. असे असतानाही बंगाले यांनी गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे अधिकारी संंभ्रमात आहेत.