शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब वाघमारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:14 IST

उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नागपूरकरांचे भूषण ठरलेल्या आणि भारतात मसाले उद्योगामध्ये अग्रस्थानी असलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे संस्थापक कृष्णराव काशीनाथपंत उपाख्य नानासाहेब वाघमारे यांचे रविवारी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नागपूरकरांचे भूषण ठरलेल्या आणि भारतात मसाले उद्योगामध्ये अग्रस्थानी असलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे संस्थापक कृष्णराव काशीनाथपंत उपाख्य नानासाहेब वाघमारे यांचे रविवारी निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्र्यंबक, प्रकाश, उमेश व राजेश ही मुले, रंजना, वंदना व कल्पना या तीन मुली आणि बराच आप्तपरिवार आहे.औद्योगिक क्षेत्रात ज्या ज्या वैदर्भीय माणसांनी उत्तुंग भरारी घेतली त्यामध्ये नानासाहेबांनी सुरू केलेल्या वाघमारे मसाले उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. २७ आॅगस्ट १९२४ ला जन्मलेल्या नानासाहेबांनी सुरुवातीचा काही काळ पत्रकारितेत कार्य केले. मात्र त्यांचा अधिक कल व्यवसायाकडेच होता. ते राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते. स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय सुरू करावा या ध्येयाने प्रेरित होऊन नानासाहेबांनी १९६५ मध्ये वाघमारे मसाल्यांची मुहूर्तमेढ रोवली. त्याअंतर्गत महाल भागात त्यांनी स्वत:चे दुकान सुरू केले. मसाल्यांची शुद्धता आणि गुणवत्ता त्यांनी नेहमीच जोपासली. त्यामुळेच वाघमारे मसाले उत्पादनाचे नाव विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्टÑ आणि देशात लोकप्रिय ठरले आणि आजही ही लोकप्रियता कायम आहे. नानासाहेब वाघमारे यांचा देवनाथ पीठाचे जितेंद्रनाथ महाराज यांच्याशी निकटचा संबंध होता. नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. शिवाय गुरव समाजाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रात कार्य केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नानासाहेबांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.